Jet Airways: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता यांचे कर्करोगामुळे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Naresh Goyal's Wife Passes Away: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळला आहे. आधी कॅन्सर, नंतर तुरुंगवास आणि आता मोठ्या कष्टाने त्यांना जामीन मिळाला आणि आता पत्नीच्या निधनामुळे नरेश गोयल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे
Jet Airways founder Naresh Goyal's wife Anita Goyal dies after battling cancer
Naresh Goyal's wife Anita Goyal dies after battling cancer eSakal

Naresh Goyal's Wife Passes Away: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळला आहे. आधी कॅन्सर, नंतर तुरुंगवास आणि आता मोठ्या कष्टाने त्यांना जामीन मिळाला होता आणि आता पत्नीच्या निधनामुळे नरेश गोयल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

गुरुवारी सकाळी जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना निधन झाले. या महिन्याच्या सुरुवातीला नरेश गोयल यांनी त्यांच्या पत्नीसोबत राहण्यासाठी वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामीन मागितला होता.

गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल हे दोघेही कर्करोगाने ग्रस्त असल्याने वैद्यकीय आणि मानवी दृष्टीकोनाच्या आधारावर त्यांनी अंतरिम जामीन मागितला होता. फेब्रुवारीमध्ये, विशेष न्यायालयाने गोयल यांना जामीन नाकारला होता परंतु त्यांना त्यांच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली होती.

अनिता गोयल यांचा जेट एअरवेजच्या कामकाजात सहभाग होता आणि त्या कार्यकारी उपाध्यक्ष होत्या. 2015 पासून त्या संचालक मंडळाचा भाग होत्या. 6 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव 2 महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता.

Jet Airways founder Naresh Goyal's wife Anita Goyal dies after battling cancer
Bank Fraud: कोण आहे धीरज वाधवान? ज्याने विजय मल्ल्या अन् नीरव मोदीपेक्षाही केलाय मोठा स्कॅम

गोयल यांना सप्टेंबर 2023 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने कॅनरा बँकेकडून जेट एअरवेजला मिळालेल्या 538.62 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग आणि गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नीला नोव्हेंबर 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, अनिता गोयल यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेऊन विशेष न्यायालयाने त्यांना त्याच दिवशी जामीन मंजूर केला.

Jet Airways founder Naresh Goyal's wife Anita Goyal dies after battling cancer
Jet Airways: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता यांचे कर्करोगामुळे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई उच्च न्यायालयाने गोयल यांना अंतरिम जामिनासाठी एक लाख रुपयांचा जातमुचलक भरावा आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडू नये असे आदेश दिले होते. गोयल यांनी वैद्यकीय आणि मानवतावादी आधारावर अंतरिम जामीन मागितला होता कारण ते आणि त्यांची पत्नी अनिता गोयल दोघेही कर्करोगाने ग्रस्त आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com