Koo Layoffs: मोठी बातमी! भारतीय ट्विटर 'कू' ने 30 टक्के कर्मचाऱ्यांना दिला नारळ; काय आहे कारण?

सुमारे 260 कर्मचारी सध्या कू सोबत काम करत आहेत. यातील 30 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.
Koo Layoffs
Koo LayoffsSakal

Koo Layoffs: भारतीय सोशल मीडिया कंपनी Koo ने 30 टक्के कर्मचाऱ्यांना सतत होणारा तोटा आणि निधीची कमतरता असताना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ट्विटरची देशांतर्गत स्पर्धक कू काही काळापासून आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. या कारणास्तव कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

सुमारे 260 कर्मचारी सध्या कू सोबत काम करत आहेत. यातील 30 टक्के लोकांची कपात करण्यात आली आहे.

ब्लूमबर्गने कंपनीच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने म्हटले आहे की कंपनीने जागतिक आर्थिक परिस्थितीनुसार पावले उचलली आहेत. अनेक जागतिक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे.

ट्विटर आणि भारतीय अधिकारी यांच्यातील तणाव वाढल्यावर कू कंपनीला खूप फायदा झाला होता. त्यावेळी अनेक सरकारी अधिकारी, क्रिकेट स्टार आणि बॉलीवूड सेलिब्रिटींसह मोठ्या संख्येने लोकांनी ट्विटरचा पर्याय म्हणून कु चा वापर केला.

त्यामुळे कु च्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढली. या देशांतर्गत सोशल मीडिया कंपनीला टायगर ग्लोबल सारख्या गुंतवणूकदारांचाही पाठिंबा आहे.

Koo Layoffs
Unemployment: भारतात पदवीधर तरुणांना रोजगार का मिळत नाही? 'या' अहवालातून आले समोर

स्टार्टअप्स संकटाचा सामना करत आहे :

मात्र, कंपनी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील स्टार्टअप्स निधीच्या समस्येशी झुंजत आहेत. अलीकडील बँकिंग संकटामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

तंत्रज्ञान क्षेत्राची स्थिती अत्यंत वाईट आहे. यामुळे असे अनेक स्टार्टअपही चिंतेत आहेत. बदललेल्या परिस्थितीत गुंतवणूकदार नवीन कंपन्यांपासून अंतर राखत आहेत.

आता कू अॅप 60 दशलक्षाहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. कंपनीचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की त्यांच्या कंपनीकडे चांगले भांडवल आहे.

त्यांनी असेही सांगितले की त्यांची कंपनी अनेक प्रयोग करत आहे जेणेकरून ते लवकरात लवकर फायदेशीर बनू शकेल. इतर स्पर्धकांच्या तुलनेत कंपनी सध्या सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये आहे.

Koo Layoffs
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com