सुपर सिस्टर्स! नोकरी सोडत व्यवसायाचा रस्ता पकडला अन् दोन्ही बहिणींनी उभा केला 50 कोटींचा ब्रँड

बिस्वास बहिणींनी मल्टीनॅशनल कंपनीतील नोकऱ्या सोडल्या आणि भारतीय साड्यांचा व्यवसाय सुरू केला.
Biswas Sisters
Biswas SistersSakal

Biswas Sisters: काही दिवसांत आई आणि आजीच्या साड्या जुन्या होतात आणि आपण त्या टाकून देतो. पण दोन बिस्वास बहिणींनी आई आणि आजीच्या साड्या घेऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

बिस्वास बहिणींनी त्यांच्या मल्टीनॅशनल कंपनीतील नोकऱ्या सोडल्या आणि भारतीय पारंपारीक साड्यांचा व्यवसाय सुरू केला. दोन्ही बहिणींनी साडीपासून 50 कोटींचा 'सुता' ब्रँड बनवला. जाणून घेऊया त्यांच्या यशाची ब्रँड स्टोरी.

तानिया बिस्वास आणि सुजाता बिस्वास यांनी 2016 मध्ये त्यांचा 'सुता' ब्रँड सुरू केला. अल्पावधीतच या दोघींच्या व्यवसायाने यशाचे शिखर गाठले. आज त्यांच्या साड्या देश-विदेशात आपला ठसा उमटवत आहेत. बिस्वास बहिणींच्या 'सुता' ब्रँडचा अर्थ आहे धागा.

कॉटनच्या साड्या घेऊन कामाला केली सुरुवात:

बिस्वास बहिणींनी कॉटन मलमलच्या साड्यांपासून त्यांचा व्यवसाय सुरू केला. स्त्रिया अनेकदा या साड्यांचा वापर घरात रोजच्या पोशाखात करतात. पूर्वी या साड्या फक्त घरापुरत्याच मर्यादित होत्या. मग सुजाता आणि तानियाने विचार केला की या साड्यांची ब्रँडींंग करुया.

बिस्वास सिस्टर्सने या कॉटन साड्या मुख्य प्रवाहात बाजारात आणल्या. आता तुम्ही पाहिलेच असेल की स्त्रिया घराव्यतिरिक्त पार्टी आणि ऑफिसमध्ये या कॉटन मलमलच्या साड्या घालतात.

सुता ब्रँड
सुता ब्रँडSakal
Biswas Sisters
HDFC Bank: तुमचेही HDFC मध्ये खाते आहे, बँकेकडून कर्ज घेतलय, जाणून घ्या विलिनीकरणानंतर काय परिणाम होईल

मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केले आहे:

बिस्वास बहिणी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होत्या. सुजाता यांनी आयआयएफटीमधून शिक्षण घेतल्यानंतर एस्सार आणि जिंदाल ग्रुपसारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे.

त्याचबरोबर तानियाने आयआयएममधून पदवी घेतल्यानंतर टाटा ग्रुप आणि आयबीएमसारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. पण, त्यांना रोजच्या कामाचा कंटाळा आला होता. त्यानंतर स्वत:चे काही काम सुरू करण्याचा विचार त्यांनी केला.

विणकरांना 40 टक्के वाटा मिळतो:

त्यांचा ब्रँड मोठा करण्यासाठी, बिस्वास बहिणींनी विणकरांना त्यांच्याशी जोडण्यास सुरुवात केली. त्या साडीच्या किंमतीपैकी 40 टक्के पैसे देतात.

बिस्वास बहिणींनी 6 लाख रुपयांपासून त्यांचा व्यवसाय सुरू केला होता जो आता 56 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यांचे पुढील लक्ष्य आता 100 कोटींपर्यंत पोहोचण्याचे आहे.

Biswas Sisters
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com