

केंद्र सरकारच्या ऑनलाइन गेमिंग बिल 2025 मुळे गेमिंग कंपन्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मोबाईल प्रीमियर लीग (MPL) कंपनीने जवळपास 300 कर्मचारी म्हणजे 60% स्टाफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या बंदीनंतर गेमिंग क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे.
Online Gaming Bill 2025: केंद्र सरकारने आणलेल्या ऑनलाइन गेमिंग बिल 2025 मुळे गेमिंग कंपन्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हे बिल मंजूर झाल्यानंतरच ड्रीम11, पोकरबाजी यांसारख्या कंपन्यांनी आपले ऑपरेशन्स बंद केले. आता बेंगळुरूस्थित युनिकॉर्न कंपनी मोबाईल प्रीमियर लीग (MPL) मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे.