Mukesh Ambani: कुठे सीईओ मिळेल का? नवीन कंपनीसाठी अंबानी सीईओच्या शोधात

Mukesh Ambani: मुकेश अंबानींनी 28 ऑगस्ट रोजी त्यांच्या नवीन कंपनीची घोषणा केली होती.
Mukesh Ambani searching CEO for Jio insurance
Mukesh Ambani searching CEO for Jio insurance Sakal

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांनी 28 ऑगस्ट रोजी त्यांच्या नवीन कंपनी Jio Financial Services Limited च्या विमा क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. रिलायन्स एजीएम 2023 मध्ये त्यांनी याची घोषणा केली. तेव्हापासून जिओ Jio Financial Services च्या सीईओचा शोध सुरु आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी Jio Financial Services Limited नवीन विमा व्यवसायासाठी CEO शोधण्यासाठी जागतिक आणि देशांतर्गत प्रमुख कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे.

गेल्या सोमवारी झालेल्या रिलायन्सच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी Jio Financial Services Limited (JFS) विमा क्षेत्रात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. अशा परिस्थितीत, 2024 च्या सुरुवातीपूर्वी जिओ इन्शुरन्ससाठी सीईओचा शोध पूर्ण करेल आणि सीईओची नियुक्ती करेल अशी अपेक्षा आहे.

Mukesh Ambani searching CEO for Jio insurance
Gas Cylinder Price: सणासुदीत सरकारचं आणखी एक गिफ्ट! व्यावसायिक सिलेंडच्या दरात मोठी कपात, किती झाला स्वस्त?

जिओ फिनचे मूल्य 1.47 लाख कोटी

मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये 140 कोटींहून अधिक भारतीयांना जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून आर्थिक सेवा पुरवल्या जातील यावर भर दिला होता.

त्यांनी सांगितले की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ब्लॉकचेन आणि सीबीडीटी आधारित उत्पादने लाँच करेल, ज्यामध्ये जीवन, सामान्य आणि आरोग्य विमा यांचा समावेश असेल. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे 1.47 लाख कोटी रुपयांचे शेअर्स नुकतेच शेअर बाजारात सूचिबद्ध झाले.

Mukesh Ambani searching CEO for Jio insurance
UPI Transaction: लोकांचा ऑनलाइन व्यवहारांवरील विश्वास वाढला, ऑगस्टमध्ये UPI ने केला सर्वोच्च विक्रम

RIL च्या वित्तीय सेवा कंपनीकडे ब्रोकिंग, AMC, NBFC, विमा आणि म्युच्युअल फंड यांचा परवाना आहे. जिओ फायनान्शिअलचे 6 कंपन्यांमध्ये होल्डिंग आहे.

या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज (RIIHL), रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स, रिलायन्स रिटेल फायनान्स, जिओ पेमेंट्स बँक, जिओ इन्फॉर्मेशन एग्रीगेटर सर्व्हिस आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग लि. यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com