
Nepal’s Gen-Z Protest
Sakal
-: डॉ.संतोष फरांदे
नेपाळमध्ये सुरू असलेल्या तीव्र राजकीय संकटाने, ज्यात जेन-झेड तरुणांच्या नेतृत्वाखालील निदर्शने, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि सोशल मीडियावर घातलेल्या बंदी विरोधातील हिंसाचारामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे.
याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. काठमांडू शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे आणि कमीत कमी ३० लोकांचा मृत्यू झाला आहे. या अस्थिरतेमुळे द्विपक्षीय व्यापार, पर्यटन, ऊर्जा पुरवठा, गुंतवणूक आणि रेमिटन्स यांसारख्या क्षेत्रांत अडथळे निर्माण झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे.