Rules Change: फास्टॅग, SBI क्रेडिट कार्डपासून ते PFपर्यंत... पैसे आणि कराशी संबंधित हे 7 नियम 1 एप्रिलपासून बदलणार

Rules Change From 1 April 2024: दरवर्षीप्रमाणे यंदाही नवे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर अनेक बदल होतील. आर्थिक वर्ष 2024-25 च्या सुरुवातीला पैसे आणि बचतीबाबत अनेक महत्त्वाचे बदल दिसून येतील.
New Rules Change From 1st April 2024 All Details Here
New Rules Change From 1st April 2024 All Details HereSakal

Rules Change From 1 April 2024: दरवर्षीप्रमाणे यंदाही नवे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर अनेक बदल होतील. आर्थिक वर्ष 2024-25 च्या सुरुवातीला पैसे आणि बचतीबाबत अनेक महत्त्वाचे बदल दिसून येतील. गुंतवणूक योजना, फास्टॅग, पीएफ आणि इतर पैशांशी संबंधित अनेक बदल 1 एप्रिलपासून होणार आहेत. जाणून घ्या 1 एप्रिलपासून कोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत.

एनपीएस प्रणालीत बदल

नवीन आर्थिक वर्षात NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये बदल होणार आहे. एप्रिल महिन्यापासून पेन्शन फंड रेग्युलेटर म्हणजेच PFRDA ने नॅशनल पेन्शन सिस्टमच्या सध्याच्या लॉगिन प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे. नवीन नियमानुसार, NPS खात्यात लॉग इन करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आवश्यक असेल. NPS सदस्यांना आधार पडताळणी आणि मोबाईलवर प्राप्त OTP द्वारे लॉग इन करावे लागेल. प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी हे बदल केले गेले आहे.

नवीन कर व्यवस्था

1 एप्रिल 2024 पासून, नवीन कर प्रणाली डीफॉल्ट कर प्रणाली बनेल. म्हणजेच, जर तुम्ही अद्याप कर भरण्याची पद्धत निवडली नसेल, तर तुम्हाला नवीन कर प्रणाली अंतर्गत आपोआप कर भरावा लागेल.

1 एप्रिल 2023 पासून आयकर नियमांमध्ये बदल करण्यात आले होते. नवीन कर प्रणाली अंतर्गत, 7 लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही.

आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत

आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे.

यानंतरही, जर कोणी नियमांचे पालन केले नाही, म्हणजे आधारशी पॅन लिंक केले नाही, तर त्याचा पॅन क्रमांक रद्द केला जाईल.

पॅन कार्ड रद्द करणे म्हणजे तुम्ही बँक खाते उघडू शकणार नाही किंवा कोणतेही मोठे व्यवहार करू शकणार नाही. पॅन सक्रिय करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये दंड देखील भरावा लागेल.

New Rules Change From 1st April 2024 All Details Here
Raghuram Rajan: भारत चीनसारखा कधीच बनू शकत नाही, असं का म्हणाले रघुराम राजन?

EPFO चा नवा नियम

नवीन आर्थिक वर्षात EPFO ​​मध्ये मोठा बदल होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू करणार आहे. नवीन नियमानुसार, तुम्ही नोकरी बदलली तरी तुमचा जुना पीएफ ऑटो मोडमध्ये ट्रान्सफर होईल.

म्हणजेच, नोकरी बदलताना तुम्हाला पीएफची रक्कम हस्तांतरित करण्याची विनंती करण्याची गरज नाही. आतापर्यंत, युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN असूनही, तुम्हाला पीएफ रकमेच्या हस्तांतरणासाठी विनंती करावी लागत होती. नवीन आर्थिक वर्षापासून हा बदल होणार आहे.

FASTag चा नवा नियम

1 एप्रिलपासून फास्टॅगशी संबंधित एक मोठा बदल होणार आहे. जर तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅगचे केवायसी बँकेकडून अपडेट केले नसेल, तर तुम्हाला 1 एप्रिलपासून समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

जर तुम्ही तुमचे फास्टॅग केवायसी केले नसेल तर ते आजच करून घ्या, कारण 31 मार्चनंतर बँका केवायसीशिवाय फास्टॅग निष्क्रिय करतील किंवा ब्लॅकलिस्ट करतील.

यानंतर फास्टॅगमध्ये शिल्लक असूनही पेमेंट केले जाणार नाही. तुम्हाला टोलवर दुप्पट टोल टॅक्स भरावा लागू शकतो. NHAI ने फास्टॅग ग्राहकांना RBI नियमांनुसार फास्टॅगसाठी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे.

New Rules Change From 1st April 2024 All Details Here
Crypto Fraud : क्रिप्टोचा खेळ विदेशात, रक्कम एजंटांच्या घशात; स्थानिक पोलिसांना मर्यादा, गुंतवणूकदारांच्या चकरा

SBI क्रेडिट कार्ड

जर तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. SBI 1 एप्रिल 2024 पासून क्रेडिट कार्ड नियमांमध्ये अनेक मोठे बदल करत आहे. तुम्ही 1 एप्रिलपासून भाडे भरल्यास, तुम्हाला कोणताही रिवॉर्ड पॉइंट दिला जाणार नाही.

हा नियम काही क्रेडिट कार्डवर 1 एप्रिलपासून लागू होईल आणि काही क्रेडिट कार्डांवर हा नियम 15 एप्रिलपासून लागू होईल.

एलपीजी गॅसचा नवा नियम

देशभरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती निश्चित केल्या जातात. प्रत्येक महिन्याप्रमाणेच एलपीजी सिलिंडरच्या किंमती 1 एप्रिल रोजी बदलल्या जातात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी त्यात कोणताही बदल करण्यास वाव नाही. आर्थिक वर्ष संपायला अजून 7 दिवस बाकी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com