Raghuram Rajan: भारत चीनसारखा कधीच बनू शकत नाही, असं का म्हणाले रघुराम राजन?

Indian Economy: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, भारताला चीनसारखे 'हुकूमशाही' राष्ट्र बनणे परवडणारे नाही, कारण आर्थिक विकासासाठी ते हानिकारक ठरू शकते. रघुराम राजन यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, चीनच्या मक्तेदारी शासन पद्धतीमुळे तेथील औद्योगिक विकासाला खूप मदत झाली आहे.
Raghuram Rajan On Indian Economy
Raghuram Rajan On Indian EconomySakal

Raghuram Rajan On Indian Economy: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, भारताला चीनसारखे 'हुकूमशाही' राष्ट्र बनणे परवडणारे नाही, कारण आर्थिक विकासासाठी ते हानिकारक ठरू शकते.

राजन यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारत गरीब असताना लोकशाहीचा मार्ग निवडला. आता आपण कमी मध्यम उत्पन्न असलेले राष्ट्र बनलो आहोत. या आर्थिक वाढीमध्ये लोकशाहीची महत्त्वाची भूमिका आहे.

रघुराम राजन यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, चीनच्या मक्तेदारी शासन पद्धतीमुळे तेथील औद्योगिक विकासाला खूप मदत झाली आहे. हायस्पीड रेल्वेसारख्या गोष्टी वेगाने विकसित करणे चीनसाठी सोपे होते. भूसंपादनासारख्या गोष्टी तिथे सोप्या आहेत.

दुसरीकडे, भारत अजूनही बुलेट ट्रेनच्या मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरवर काम करत आहे. अशा प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना भारत सरकारला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.

पुढील ५-६ वर्षांत भारत जपानला मागे टाकेल, तेव्हाही आपण 'तुलनेने गरीब देश' असू, असे राजन म्हणाले. एकूण उत्पन्नापेक्षा दरडोई उत्पन्नाकडे पाहिले पाहिजे असे ते म्हणाले. (Raghuram Rajan said that India can not became like china because of democracy)

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, भारताला लोकशाहीच्या आधारे आर्थिक प्रगतीचे मॉडेल तयार करावे लागेल. आम्हाला आमच्या नागरिकांना अधिक अधिकार द्यावे लागतील. नागरिकांच्या प्रश्नांना सरकारला सामोरे जावे लागेल. मात्र, या दशकाला भारताच्या आर्थिक प्रगतीचा सर्वोत्तम काळ मानण्यास त्यांनी नकार दिला. (Raghuram Rajan on why India can't be like China now)

Raghuram Rajan On Indian Economy
Gautam Adani: अदानी अंबानींना देणार टक्कर? मोफत 5G इंटरनेट आणण्याच्या तयारीत; काय आहे प्लॅन?

माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी 15 मार्च रोजी भारताचे ताजे GDP आकडे 'पूर्णपणे अनाकलनीय' आहेत म्हटले होते. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना सुब्रमण्यन म्हणाले, “मला नवीन GDP आकडे समजू शकत नाहीत, ते अनाकलनीय आहेत.

Raghuram Rajan On Indian Economy
Income Tax: आयकर वाचवायचा आहे? तर 31 मार्चपूर्वी 'या' कर बचत योजनांमध्ये करा गुंतवणूक

उदाहरणार्थ, सरकारने दिलेले महागाईचे आकडे 1-1.5% च्या दरम्यान आहेत, परंतु वास्तविक महागाई 3-5% च्या आसपास आहे.” अर्थव्यवस्था 7.5% दराने वाढत असताना खाजगी वापर 3% ने कमी होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com