Zerodha: अभिमानास्पद! झिरोधाच्या निखिल कामथ यांची मोठी घोषणा, कमाईचा ५०% भाग करणार दान

देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनल्यानंतर, ते आता आपली संपत्ती धर्मादाय कार्यासाठी दान करणार आहे.
Zerodha Founder Nikhil Kamath
Zerodha Founder Nikhil Kamath Sakal

Nikhil Kamath Signs Pledge To Donate His Wealth: भारतातील सर्वात वेगाने वाढणारी स्टॉक ब्रोकिंग कंपनी Zerodha चे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी मोठी घोषणा केली आहे. अलीकडेच, देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनल्यानंतर, ते आता आपली संपत्ती धर्मादाय कार्यासाठी दान करणार आहे.

त्यांनी दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे आणि अब्जाधीश बिल गेट्स यांच्या 'द गिव्हिंग प्लेज'मध्ये त्यांची संपत्ती धर्मादाय कार्यासाठी दान केली आहे. त्यात सामील होणारे ते चौथा भारतीय ठरले आहेत.

३६ वर्षीय निखिल कामथ गेल्या दोन दशकांपासून शेअर मार्केटमध्ये सक्रिय आहेत, त्यांनी तरुण वयातच या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आणि खूप लवकर ते श्रीमंतांच्या यादीत सामील झाले.

'या' भारतीयांचाही या मोहिमेत सहभाग:

वॉरेन बफे आणि बिल गेट्स यांनी २०१० मध्ये स्थापन केलेल्या द गिव्हिंग प्लेजमध्ये सामील होणारे निखिल कामथ हे चौथ्ये भारतीय ठरले आहेत. यापूर्वी अझीम प्रेमजी, किरण मुझुमदार-शॉ आणि रोहिणी आणि नंदन निलेकणी यात सामील झाले आहेत.

विशेष म्हणजे, 'गिव्हिंग प्लेज' ही एक मोहीम आहे, जी जगातील श्रीमंतांना त्यांच्या हयातीत किंवा त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या संपत्तीपैकी किमान अर्धी संपत्ती परोपकारासाठी दान करण्यास प्रोत्साहित करते.

फोर्ब्सच्या मते, निखिल कामथची एकूण संपत्ती ३.१४ बिलियन डॉलर (सुमारे 28 हजार कोटी) आहे. निखिल कामथ एकूण कमाईच्या ५०% रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला आहे. (Nikhil Kamath to donate 50% of wealth to Bill Gates-Warren Buffet founded The Giving Pledge)

शाळा सोडल्यापासून अब्जाधीश होण्याचा प्रवास:

शाळा सोडल्यापासून ते देशातील सर्वात तरुण अब्जाधीश होण्यापर्यंतचा निखिल कामथचा प्रवासही खूप रंजक आहे. स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी झिरोधाचे सह-संस्थापक ओळखले जातात.

त्यांची कंपनी सध्या देशातील सर्वात वेगाने वाढणारी स्टॉक ब्रोकिंग कंपनी आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या प्रवासाचे वर्णन करताना सांगितले होते की,

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि त्यांची पहिली नोकरी एका कॉल सेंटरमध्ये होती, जिथे त्यांना फक्त ८,००० रुपये पगार मिळत होता.

Zerodha Founder Nikhil Kamath
Ratan Tata: रतन टाटांच्या मदतीने अवघ्या 21व्या वर्षी उभारली 500 कोटींची कंपनी

शेअर बाजारात प्रवेश आणि पालटले नशीब :

निखिल कामथला नोकरीत रस नसल्याने त्यांनी शेअर बाजारात एंट्री घेऊन व्यवसाय सुरू केला. येथूनच त्यांचे श्रीमंत होण्यास सुरुवात झाली.

निखिल कामथच्या यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी शेअर ट्रेडिंग करण्यास सुरूवात केली तेव्हा त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही.

मात्र, वर्षभरातच त्यांना बाजारपेठेची किंमत कळली आणि त्यांनी त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही, त्यांची संपत्ती एवढ्या वेगाने वाढली की आज ते देशातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून समोर आले आहेत.

Zerodha Founder Nikhil Kamath
Shivrajyabhishek Sohala : हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती, हा तर भारतीयत्वाचा अरुणोदय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com