

Election Results Out: Will Petrol and Diesel Become Costlier Now?
eSakal
Petrol Price Today: पश्चिम आशियात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेल दरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पश्चिम बंगालसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे आतापर्यंत इंधन दरवाढ रोखून ठेवण्यात आल्याची चर्चा होती. निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेल महागणार, असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच 1 मेपासून व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर इंधन दर वाढतात का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.