

Post Office SCSS Scheme: Earn ₹17,000 Monthly with Zero Risk Investment
eSakal
Post Office Saving Scheme : प्रत्येक जण आपल्या पगारातून थोडीफार बचत करून ती सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याचा विचार करतो. कारण, निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे आणि मुबलक प्रमाणात पैसे आपल्याकडे राहावे हा त्यामागचा विचार असतो. याच कारणासाठी सरकारच्या हमीसह असलेल्या पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वाधिक विश्वासार्ह मानल्या जातात. अशाच योजनांपैकी पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम (SCSS) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.