Powerball Jackpot: लॉटरीनं बनवलं मालामाल! रातोरात बनला 8,200 कोटींचा मालक

कोणाचं नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही.
Powerball Jackpot
Powerball JackpotSakal

Powerball Jackpot: कोणाचं नशीब कधी, कसं बदलेल हे सांगता येत नाही. अनेकदा नशीब आजमावणारे लोक लॉटरीत गुंतवणूक करतात, पण नशीब त्यांना साथ देतं असं फार क्वचितच घडतं. पण असं म्हणतात की नशीब जेव्हा देतं तेव्हा ते भरभरून देतं. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला जो रातोरात करोडो रुपयांचा मालक बनला आहे.

लॉटरीच्या तिकिटाने लॉस एंजेलिसमध्ये राहणारी व्यक्ती थेट 8,206 कोटी रुपयांचा मालक बनवला आहे. या व्यक्तीने 1 अब्ज डॉलर पॉवरबॉल जॅकपॉट जिंकला आहे.

19 जुलै रोजी काढलेल्या लकी ड्रॉमध्ये लॉस एंजेलिसमधील लास पालमिटास मिनी मार्केटमधील एका व्यक्तीने लॉटरी जिंकली. लॉटरी विजेत्याची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

पॉवरबॉल हे लॉटरी उद्योगातील खूप मोठे नाव आहे. याआधीही पॉवरबॉलचे हजारो कोटींचे जॅकपॉट बाहेर आले आहेत. कॅलिफोर्निया लॉटरी वेबसाइटनुसार, त्या व्यक्तीचा लॉटरी क्रमांक 7-10-11-13-24 आणि पॉवरबॉल क्रमांक 24 होता.

मल्टी स्टेट लॉटरी असोसिएशनच्या मते, पॉवरबॉल जॅकपॉट जिंकण्याची शक्यता 292.2 दशलक्ष लोकांपैकी एक आहे. पॉवरबॉल जॅकपॉटच्या आकडेवारीनुसार, त्याची रक्कम 1 अब्ज डॉलर होती, जी बुधवारी सोडतीच्या वेळी 1.08 बिलियन डॉलरवर पोहोचली.

पैसे घेण्यासाठी दोन पर्याय

जॅकपॉट जिंकणाऱ्या व्यक्तीकडे लॉटरीत जिंकलेली बक्षिसाची रक्कम गोळा करण्यासाठी दोन पर्याय असतात. हे पैसे तो एकरकमी किंवा हप्त्याने घेऊ शकतो.

विजेत्याने एकरकमी रक्कम घेणे निवडल्यास, त्यांना 558.1 दशलक्ष डॉलर (रु. 4,582 कोटी) मिळतील. जर त्याने हप्त्यांमध्ये पैसे घेतले तर त्याला एकूण 8,206 कोटी रुपये मिळतील.

Powerball Jackpot
Google Employees Salaries: गुगलच्या कर्मचाऱ्यांचा पगार ऐकून बसेल धक्का, माहिती झाली लीक

पॉवरबॉल लॉटरीच्या इतिहासात जॅकपॉटच्या रकमेने 1 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडण्याची ही तिसरी वेळ आहे. पॉवरबॉलचा आतापर्यंतचा सर्वात मोठा जॅकपॉट 2.04 अब्ज (रु. 16,886 कोटी) होता जो नोव्हेंबर 2022 मध्ये बाहेर आला होता.

पॉवरबॉल जॅकपॉटमधून आतापर्यंत अनेक लोक श्रीमंत झाले आहेत. 5 जानेवारी 2022 रोजी कॅलिफोर्निया आणि विस्कॉन्सिनमधील दोन लोकांनी 5,235 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली.

27 एप्रिल 2022 रोजी अॅरिझोनामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने 3,900 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला होता. 3 ऑगस्ट 2022 रोजी पेनसिल्व्हेनियामधील एका व्यक्तीने 1,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा जॅकपॉट जिंकला होता.

Powerball Jackpot
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com