Ratan Tata Birthday : रतन टाटा दिवसाला किती कमवतात?

रतन टाटा दिवसाला किती कमवतात? जाणून घ्या
Ratan Tata Birthday
Ratan Tata Birthdaysakal

आज उद्योग जगात नावाजलेले प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा 85 वा वाढदिवस आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रात घेतलेली भरारी अनेकांना प्रेरणादायी आहे. शुन्यापासून विश्व कसं निर्माण करता येतं, याचं एकमेव उदाहरण म्हणजे रतन टाटा होय. त्यांचं उद्योग क्षेत्रात केलेलं योगदान हे अतुलनीय आहे. स्मार्ट इंडस्ट्री असो की स्मार्ट वर्क प्रत्येक ठिकाणी टाटा आहे.

देशातील श्रीमंत व्यक्तीमधील एक रतन टाटा हे लग्जरी लाइफ जगतात. पण तुम्हाला माहिती आहे का रतन टाटा दिवसाला किती कमवतात? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Ratan Tata Birthday How much Ratan Tata earn per day read story)

रतन टाटा २०२१ च्या आकडेवारीनुसार जवळपास एक बिलियन डॉलरचे मालक आहेत. टाटा कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, टायटन, टाटा कॅपिटल, टाटा पॉवर, इंडियन हॉटेल्स, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा डिजिटल आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे याशिवाय ते अनेक कंपन्यांचे मालक आहेत.

Ratan Tata Birthday
जमशेदजी टाटा जयंती : Ratan Tata झाले भावूक म्हणाले...

रतन टाटा दिवसाला किती कमवतात?

रतन टाटाची एक दिवसाची किमत जवळपास तीन कोटींपेक्षा जास्त आहे.

Ratan Tata Birthday
Ratan Tata: रतन टाटा यांचा बायोपिक येणार... दाक्षिणात्य दिग्दर्शक करणार निर्मिती

रतन टाटा खूप आर्थिक मदत करतात

रतन टाटा खूप अॅक्टीव्ह व्यक्तिमत्त्व आहे. सतत सोशल मीडियावर ते अॅक्टीव्ह असतात. एवढंच काय तर ते नेहमी न्यु स्टार्टअप करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देत असतात. कधी कुणाच्या शिक्षणाचा खर्च तर कधी कुणाच्या बिझिनेसला मदत, कधी कोणाला नोकरी तर कधी कोणत्या संस्थेला मदत करतात.

त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांचे देशभरात असंख्य चाहते आहेत. सध्या त्यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी जोर धरुन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com