Gautam Adani: गौतम अदानींचे जोरदार कमबॅक, हिंडनबर्ग अहवालानंतर पुन्हा 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये सामील

Gautam Adani: हिंडेनबर्ग वादानंतर अदानी पुन्हा 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये परतले आहेत. 2023 च्या सुरुवातीला शॉर्ट-सेलर हिंडेनबर्गच्या आरोपानंतर गौतम अदानी यांनी त्यांची संपत्ती परत मिळवली आहे. बुधवारी, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 2.7 अब्ज डॉलर्सने वाढून 100.7 अब्ज डॉलरवर पोहोचली.
Gautam Adani is back in the 100 billion dollar club after Hindenburg bombshell
Gautam Adani is back in the 100 billion dollar club after Hindenburg bombshellSakal

Gautam Adani: हिंडेनबर्ग वादानंतर गौतम अदानी पुन्हा 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये परतले आहेत. 2023 च्या सुरुवातीला शॉर्ट-सेलर हिंडेनबर्गच्या आरोपानंतर गौतम अदानी यांनी त्यांची संपत्ती परत मिळवली आहे. बुधवारी, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 2.7 अब्ज डॉलर्सने वाढून 100.7 अब्ज डॉलरवर पोहोचली.

हिंडेनबर्ग संशोधन अहवालात करण्यात आलेल्या आरोपानंतर त्यांच्या संपत्तीत आता वाढ होताना दिसत आहे. अदानी समूहाने नेहमीच हे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.

गौतम अदानी जगातील 12वे सर्वात श्रीमंत व्यक्ती

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, गौतम अदानी आता जगातील 12 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, ते मुकेश अंबानी यांच्यापेक्षा फक्त एका स्थानाने खाली आहेत.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीने या महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी उच्चांक गाठला असताना, गौतम अदानी यांची संपत्ती 2022पेक्षा सुमारे 50 अब्ज डॉलरने कमी होती. शॉर्ट सेलरच्या अहवालानंतरच्या महिन्यात, गौतम अदानी यांच्या संपत्तीत 80 अब्ज डॉलरपेक्षा जास्त घट झाली होती.

Gautam Adani is back in the 100 billion dollar club after Hindenburg bombshell
RBI MPC Meeting: तुमच्या कर्जाचा EMI कमी झाला की वाढला? रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर

ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये इलॉन मस्क 205 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती 24.5 अब्ज डॉलरने घसरली आहे. मात्र असे असूनही ते या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक दररोज जगातील सर्वात श्रीमंतांची क्रमवारी जाहीर करते.

Gautam Adani is back in the 100 billion dollar club after Hindenburg bombshell
PM Modi: डॉ. मनमोहन सिंग यांचं योगदान मोठं! मोदींनी केलं कौतुक, मार्गदर्शन करत राहण्याची केली विनंती

जागतिक गुंतवणूकदारांची नजर भारतावर

गौतम अदानी यांचे पुनरागमन आणि सर्वसाधारणपणे, भारताची झालेली वाढ यामुळे जगभरातील गुंतवणूकदार भारताकडे वळत आहेत, ज्यामुळे शेअर बाजाराला चालना मिळण्यास मदत होत आहे. गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅनली या बँकांनी पुढील दशकासाठी भारताला गुंतवणूकीचे प्रमुख ठिकाण म्हणून घोषित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com