RBI Action On Bnak : RBI चा ५ बँकांना दणका! महाराष्ट्रातील 'या' बँकांचा समावेश; वाचा काय आहे कारण?

RBI ने यापैकी 3 बँकांवर अंशतः निर्बंध लादले आहेत आणि इतर दोन बँकांवर पूर्ण निर्बंध लादले आहेत.
RBI
RBI Sakal

RBI Bank Corporate Action: RBI ने शुक्रवारी देशातील 5 सहकारी बँकांवर काही निर्बंध लादले आहेत. यामध्ये बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा देखील समाविष्ट आहे. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की, या बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

बँकांवर व्यवसाय निर्बंध :

आर्थिक स्थितीचे कारण देत RBI ने 24 फेब्रुवारी 2023 पासून 5 सहकारी बँकांवर व्यवसाय निर्बंध लादले आहेत. आरबीआयने म्हटले आहे की, केंद्रीय बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय ते नवीन ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कर्ज देऊ शकत नाही.

RBI ने यापैकी 3 बँकांवर अंशतः ठेवी काढण्यावर निर्बंध लादले आहेत आणि इतर दोन बँकांवर पूर्ण निर्बंध लादले आहेत.

RBI ने सांगितले की, बँकेच्या पात्र ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव विमा रक्कम मिळण्याचा अधिकार असेल. आरबीआयच्या सूचनांचा मुद्दा आरबीआयने बँकिंग परवाना रद्द केला म्हणून घेऊ नये.

या बँका त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंधांसह बँकिंग कामकाज चालू ठेवू शकतात. यापूर्वी देशातील कमकुवत सहकारी बँकांवर कारवाई करताना आरबीआयने त्यांच्या बँकांचे परवानेही रद्द केले आहेत.

RBI
Shipping Corporation of India : डिमर्जर प्लानच्या मान्यतेनंतर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये वाढ

या बँकांवर बंदी घालण्यात आली :

रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेल्या पाच सहकारी बँकांमध्ये एचसीबीएल सहकारी बँक, लखनौ (HCBL Co-operative Bank), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद (Adarsh Mahila Nagari Sahakari Bank Maryadit), शिमशा.

सहकारी बँक नियामठा मद्दूर-कर्नाटक (Shimsha Sahakara Bank Niyamitha), उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा-आंध्र प्रदेश (Uravakonda Co-operative Town Bank Ltd) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज-महाराष्ट्र (Shankarrao Mohite Patil Sahakari Bank) या बँकांचा समावेश आहे.

बँकांवर बंदी घालण्याचे कारण :

RBI कडून वेळोवेळी बँकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. नियमांचे उल्लंघन आणि इतर कारणांसाठी बँकांवर कारवाई केली जाते.

RBI
डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

अलीकडे काही राष्ट्रीयीकृत बँकांना दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यांच्या कामकाजात अनेक प्रकारच्या उणिवा दिसून आल्या आहेत. त्यामुळे मध्यवर्ती बँकेने त्यांच्यावर मोठा दंड ठोठावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com