Subhash Chandra: 22,006 कोटींचे कर्जाचे दावे अन् सेटलमेंट फक्त 6.25 कोटींचं? सुभाष चंद्रांचे नेमकं प्रकरण काय?

Subhash Chandra NCLT case: 22,006 कोटींच्या दाव्यांच्या तुलनेत सुभाष चंद्रा यांच्याकडून वैयक्तिक गॅरंटर म्हणून फक्त 6.25 कोटी देण्याचा प्लॅन NCLTने मंजूर केला आहे. या निर्णयाला काही बँकांनी विरोध केला असून, 22 हजार कोटींचा आकडा आणि ‘हेअरकट’बाबत नेमकं सत्य काय आहे, जाणून घ्या.
Subhash Chandra Loan Settlement Explained

Subhash Chandra: ₹22,006 Crore Claims Settled for Just ₹6.25 Crore? Here's What NCLT Decided

eSakal

Updated on

Subhash Chandra ₹6.25 crore settlement Explained: देशातील प्रमुख मीडिया कंपनी Essel Group आणि ZEE मीडियाचे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्याशी संबंधित तब्बल 22,006 कोटींच्या दिवाळखोरी प्रकरणात नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT) ने मंजूर केलेल्या सेटलमेंट प्लॅनची मोठी चर्चा सुरू आहे. यात तब्बल 22,006 कोटींच्या कर्जापैकी सुभाष चंद्रा यांच्याकडून वैयक्तिक गॅरंटर म्हणून फक्त 6.25 कोटी देण्याची योजना मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. NCTL च्या या निर्णयाबाबत काही बँकांनी हा प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे सांगत विरोध केला आहे. तर दुसरीकडे, सरकारी सूत्रांच्या मते 22,006 कोटींच्या संपूर्ण कर्जावर 99.97 टक्के हेअरकट झाल्याचे म्हणणे दिशाभूल करणारे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com