

Sugar Prices Rise Despite Government Measures; Rates Jump 30% in a Month, Check Mumbai Price
eSakal
Sugar price per kg in Mumbai and India: देशात साखर दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत असतानाही साखरेच्या किमतीत वाढ सुरूच आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सोमवार, 31 ऑगस्ट रोजी देशातील साखरेचा सरासरी किरकोळ भाव 63.28 रुपये प्रति किलो होता. आठवडाभरापूर्वी हा दर 63 रुपये होता. विशेष म्हणजे, सध्याचा किरकोळ भाव महिनाभरापूर्वीच्या तुलनेत सुमारे 30 टक्क्यांनी, तर गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत 38.63 टक्क्यांनी अधिक आहे.