Hurun India Rich: कोणत्या क्षेत्रात भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती? आपल्याला वाटतं फक्त अंबानीच...

Hurun India Rich List 2023: श्रीमंतांच्या यादीत अंबानींनी अदानींना मागे टाकले आहे
The richest Indians come from pharma, chemicals and industrials
The richest Indians come from pharma, chemicals and industrialsSakal

Hurun India Rich List 2023: रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. तर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस एस पूनावाला तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

सायरस पूनावाला, शिव नाडर यांच्यासोबतच कैवल्य वोहरा यांनीही श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याचवेळी बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना यादीतून वगळण्यात आले आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टने 2023 ही यादी प्रसिद्ध केली आहे.

2022 मध्ये गौतम अदानी मुकेश अंबानींपेक्षा 3 लाख कोटींनी पुढे होते. मात्र, मुकेश अंबानींनी आता हे अंतर भरून काढले असून 2023 मध्ये ते पुढे गेले आहेत. मुकेश अंबानी यांची संपत्ती 8.08 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

360 वन वेल्थ आणि हुरुन इंडिया यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासानुसार, 2023 मध्ये भारतातील 133 श्रीमंत व्यक्ती फार्मास्युटिकल उद्योगातील आहेत.

The richest Indians come from pharma, chemicals and industrials
Byju's: बायजूला मोठा झटका! आता स्वतःची मालमत्ता विकता येणार नाही, काय आहे कारण?

या अभ्यासात देशभरातील 1,319 व्यक्तींच्या संपत्तीचा आढावा घेण्यात आला असून त्यांचे नेट वर्थ 1,000 कोटी रुपये आहे. सायरस एस पूनावाला, शिव नाडर आणि गोपीचंद हिंदुजा यांचाही श्रीमंत भारतीयांमध्ये क्रमांक लागतो. अदानी ग्रुपचे विनोद शांतीलाल अदानी आणि कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक यांची जागा घेत कुमार मंगलम बिर्ला आणि निरज बजाज 2023 च्या टॉप 10 यादीत पुन्हा आले आहेत.

The richest Indians come from pharma, chemicals and industrials
Adani Group: अदानी समूहाच्या शेअर्सची गाडी सुसाट! कंपन्यांचे मार्केट कॅप 10.9 लाख कोटींच्या पुढे

हुरुन इंडिया अभ्यासातील महत्त्वाचे मुद्दे

  • झोहोच्या राधा वेंबू या नायकाच्या फाल्गुनी नायरला मागे टाकून श्रीमंतांच्या यादीत सर्वात श्रीमंत भारतीय महिला बनल्या आहेत.

  • केदार खाजगी इक्विटी फंडचे व्यवस्थापक मनीष केजरीवाल 3,000 कोटी रुपयांसह या यादीत प्रवेश करणारे पहिले भारतीय ठरले आहेत.

  • 20,800 कोटी रुपयांच्या संपत्तीसह अरिस्ता नेटवर्क्सच्या जयश्री उल्लाल या यादीतील सर्वात श्रीमंत भारतीय व्यावसायिक आहेत.

  • मुंबई, नवी दिल्ली आणि बेंगळुरू या शहरांमधून सर्वात जास्त व्यावसायिक उलाढाल झाली आहे; तिरुपूर या यादीत नवीन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com