
ट्रम्प यांनी भारतातील सर्व वस्तूंवर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली, रशियासोबत व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवरही दंड.
भारतीय कंपन्यांना यामुळे नवे जागतिक बाजारपेठ मिळू शकतात, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन अमेरिका’ या दोन्ही संधी खुल्या.
भारतीय सरकारने व्यापार धोरण लवचिक करायला हवं.
Donald Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक व्यापार क्षेत्रात खळबळ उडवणारी घोषणा केली आहे. त्यांनी जाहीर केलंय की येत्या 1 ऑगस्टपासून भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या सर्व वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) आकारलं जाईल. एवढंच नाही, तर रशियाकडून खनिज तेल आणि लष्करी उपकरणांची खरेदी करणाऱ्या भारतीय कंपन्यांवरही दंडात्मक कारवाई होईल, असाही इशारा ट्रम्प यांनी दिलाय.
ही घोषणा भारतासाठी मोठा आर्थिक धक्का वाटतो. पण काही जाणकार आणि उद्योजकांच्या मते, हीच परिस्थिती भारतासाठी आर्थिक संधींची नवी दारं उघडू शकते.