MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीची सासू आहे 800 कोटींची मालकीण; असा उभारला कोट्यवधींचा व्यवसाय

MS Dhoni Mother In Law : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा केवळ क्रिकेटचा बादशहा नाही, तर व्यावसायिक जगतातही तो स्टार आहे. धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे त्याच्या कंपनीचे नाव आहे
MS Dhoni Mother In Law
MS Dhoni Mother In LawSakal

Mahendra Singh Dhoni Business: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा केवळ क्रिकेटचा बादशहा नाही, तर व्यावसायिक जगतातही तो स्टार आहे. धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे त्याच्या कंपनीचे नाव आहे, ज्याची देखभाल त्याची सासू म्हणजेच साक्षी धोनीची आई शीला सिंग करतात. त्या या प्रॉडक्शन हाऊसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

शीला सिंग या 800 कोटी रुपयांच्या कंपनीच्या मालक आहेत. त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. महेंद्रसिंग धोनीचे अनेक व्यवसाय असले तरी त्याने पाच वर्षांपूर्वी धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरु केली. आई आणि मुलीने हा व्यवसाय पुढे नेत 800 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. साक्षी ही एमएस धोनीच्या मालकीच्या कंपनीची प्रमुख शेअरहोल्डर आहे. (Meet Sheila Singh, MS Dhoni's CEO mother-in-law who runs Rs 800 crore firm)

MS Dhoni Mother In Law
Paytm: पेटीएमला आणखी एक झटका! सरकारने पेटीएम पेमेंट सर्व्हिसेसमध्ये गुंतवणूक करण्यास घातली बंदी, काय आहे कारण?
MS Dhoni Mother In Law
MS Dhoni Mother In Law Sakal

शीला सिंग पहिल्यांदाच व्यवसाय सांभाळत आहेत

एमएस धोनीची सासू शीला सिंग पहिल्यांदाच व्यवसाय सांभाळत आहे. या आधी त्या गृहिणी होत्या. एमएस धोनी प्रॉडक्शन सध्या LGM-Let's Get Married नावाचा चित्रपट बनवत आहे. याआधी 'द लायन ऑफ द लायन'चीही निर्मिती झाली होती. महेंद्रसिंग धोनी अनेक व्यवसायांमध्ये भागीदार तर आहेच पण काही ब्रँड्सचा ॲम्बेसेडरही आहे.

एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी हे चेन्नईतील रांची रेज हॉकी क्लबचेही मालक आहेत. साक्षी अनेकदा या क्लबबद्दलचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. हा संघ हॉकी इंडिया लीगमध्ये खेळतो. साक्षी दिल्लीतील Rhiti MSD Alamode Private Limited नावाच्या क्रीडा संघटनेची मालकही आहे.

MS Dhoni Mother In Law
iPhone Camera Module : चीनचा बाजार उठणार? टायटन अन् मुरुगप्पा ग्रुप भारतात बनवू शकतात आयफोनचे कॅमेरे; रिपोर्टमध्ये दावा

धोनीने बेंगळुरूमध्ये एमएस धोनी ग्लोबल स्कूलही सुरु केले आहे. ही CBSE इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेला यांच्याशी भागीदारी करून, ही शाळा उभारण्यात आली आहे. धोनीने कंपनी 7Ink Brews मध्येही गुंतवणूक केली आहे.

एमएस धोनी एक मोठी जिम चेन देखील चालवतो. धोनी स्पोर्ट्सफिट असे त्याचे नाव आहे. तो त्याचा मालक आहे. ही जिम चेन देशभरात 200 हून अधिक ठिकाणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com