Grain Storage: PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी सुरू केली जगातील सर्वात मोठी 'गोदाम योजना'; असा होणार लाभ

Grain Storage Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (24 फेब्रुवारी) 11 राज्यांमधील प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) मध्ये धान्य साठवण्यासाठी 11 गोदामांचे उद्घाटन केले. ही गोदामे सहकार क्षेत्रातील सरकारच्या जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेचा भाग आहेत.
World's largest grain storage plan in cooperative sector PM Modi inaugurates 11 godowns
World's largest grain storage plan in cooperative sector PM Modi inaugurates 11 godownsSakal

Grain Storage Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (24 फेब्रुवारी) 11 राज्यांमधील प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) मध्ये धान्य साठवण्यासाठी 11 गोदामांचे उद्घाटन केले. ही गोदामे सहकार क्षेत्रातील सरकारच्या जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेचा भाग आहेत.

गोदामे आणि इतर कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी देशभरात अतिरिक्त 500 PACS ची पायाभरणीही मोदींनी केली. त्यांनी देशभरातील 18,000 PACS च्या संगणकीकरणाच्या प्रकल्पाचे उद्घाटनही केले.

नाबार्ड आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) च्या मदतीने PACS गोदामांना अन्न पुरवठा साखळीशी जोडणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. एका मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, सहकार क्षेत्र अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी उपयुक्त आहे. (World's largest grain storage plan in cooperative sector PM Modi inaugurates 11 godowns)

खाद्यतेल आणि खतांची आयात कमी करा

ते म्हणाले, आज आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी जगातील सर्वात मोठी साठवण योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशभरात हजारो गोदामे बांधली जाणार आहेत. खाद्यतेल आणि खतांसह कृषी उत्पादनांसाठी आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी सहकारी क्षेत्राला मदत करण्याचे आवाहन मोदींनी केले. (PM Modi to launch world’s largest co-operative sector grain storage plan to empower small farmers)

World's largest grain storage plan in cooperative sector PM Modi inaugurates 11 godowns
Stock to Buy: 'या' स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत दिला 80 टक्के परतावा; आणखी वाढीचा तज्ज्ञांना अंदाज

या कार्यक्रमांतर्गत येत्या पाच वर्षांत सहकार क्षेत्रात हजारो गोदामे बांधून 700 लाख टन साठवण क्षमता निर्माण केली जाईल, असे मोदी म्हणाले. आज आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी जगातील सर्वात मोठी साठवण योजना सुरू केली आहे, असे त्यांनी 11 राज्यांमध्ये 11 पॅकद्वारे उभारलेल्या 11 गोदामांचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले. याअंतर्गत देशभरात हजारो गोदामे बांधली जाणार आहेत.

World's largest grain storage plan in cooperative sector PM Modi inaugurates 11 godowns
RBI: सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे होणार सोपे; RBI ने PPIला दिली मान्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com