Nirmala Sitharaman
sakal
‘‘दहा आणि वीस रुपयांच्या पॉलिमरच्या नोटा प्रायोगिक तत्त्वावर छापल्या जाणार असून दोन्ही मूल्याच्या चलनांच्या प्रत्येकी शंभर कोटी रुपयांच्या नोटा जारी केल्या जातील, ’’ अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. दहा आणि वीस रुपयांच्या पॉलिमरच्या नोटा प्रायोगिक तत्त्वावर छापण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेने दिला होता.