

RBI Replaces Torn and Soiled Notes Across India
Esakal
देशात गेल्या तीन वर्षात ६२.१३ अब्जांच्या नोटा चलनातून बाहेर करण्यात आल्या आहेत. यात घासल्यानं, फाटल्यानं किंवा घाण झाल्यानं नोटा चलनातून बाद कराव्या लागल्या. काही नोटांवर मोबाईल नंबर लिहिण्यात आलेले, काहींवर स्टेपल पिन तर काही नोटा चुरगळून ठेवण्यात आलेल्या होत्या. आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०२४-२५मध्ये सर्वाधिक नोटा खराब झाल्या.