Adani New Company: अजून वाद मिटले नाहीत अन् अदानी समूहाने स्थापन केली नवी कंपनी, 'या' क्षेत्रात केली एन्ट्री

Adani Group New Company: अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडने याबाबत शेअर बाजारांना माहिती दिली आहे.
Adani Group New Company
Adani Group New CompanySakal

Adani Pelma Collieries: गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादात गौतम अदानी यांचा अदानी समूह व्यवसाय वाढवत आहे. यासाठी अदानी समूहाने नवीन कंपनी स्थापन केली आहे, जी नवीन क्षेत्रात व्यवसाय करणार आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडने याबाबत शेअर बाजारांना माहिती दिली आहे.

गेल्या आठवड्यात कंपनी स्थापन झाली :

अदानी एंटरप्रायझेसने स्टॉक एक्स्चेंजला कळवले आहे की त्यांनी कोळसा धुण्याचा व्यवसाय करण्यासाठी एक नवीन पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे.

नवीन कंपनीचे नाव Pelma Collieries आहे, जी अदानी एंटरप्रायझेसची 100 टक्के मालकीची उपकंपनी आहे. 07 एप्रिल रोजी नवीन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

Pelma Collieries कोळसा हाताळणी प्रणालीसह कोल वॉशरीज बांधण्याचा आणि चालवण्याचा व्यवसाय हाती घेईल आणि या संदर्भात सर्व आवश्यक काम करेल. अदानी एंटरप्रायझेसने सांगितले की, पेल्मा कॉलरीज लवकरच त्यांचे कार्य सुरू करेल.

हे वर्ष अदानी समुहासाठी फारसे चांगले राहिलेले नाही. वर्षाच्या पहिल्या महिन्यात, जानेवारीमध्ये, अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने एक वादग्रस्त अहवाल जारी करून अदानी समूहासमोर अडचणी निर्माण केल्या.

अहवालानंतर अदानी समूहाला खूप नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर, द केन ते एफटी पर्यंतचे अहवाल अदानी समूहा विरोधात होते. दुसरीकडे, देशांतर्गत आघाडीवर, अदानी समूहालाही राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सामना करावा लागत आहे.

Adani Group New Company
Gautam Adani : हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतरही LIC चा अदानींवर विश्वास कायम, घेतला मोठा निर्णय

LIC ने अदानी समूहात वाढवली गुंतवणूक:

एलआयसीने अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन गॅस आणि अदानी पोर्टमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलआयसीने अदानींच्या एसीसी आणि अंबुजा सिमेंट या सिमेंट कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे.

या गुंतवणुकीनंतर अदानींच्या कंपन्यांमधील एलआयसीची गुंतवणूक वाढली. अदानी एंटरप्रायझेसमधील हिस्सा 4.26 टक्क्यांवर गेला. अदानी ट्रान्समिशनमधील भागीदारी वाढून 3.68 टक्के झाली.

Adani Group New Company
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com