TAC Infosec Limited IPO : 27 मार्चपासून येतोय आणखी एक आयपीओ ; टीएसी इन्फोसेकबद्दल डिटेल्स जाणून घेऊयात...

रिस्क मॅनेजमेंट सेक्टरमधील कंपनी टीएसी इन्फोसेक लिमिटेडचा (TAC Infosec Limited) आयपीओ 27 मार्चला उघडणार आहे. यासाठी 100-106 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.
TAC Infosec Limited IPO
TAC Infosec Limited IPOsakal

रिस्क मॅनेजमेंट सेक्टरमधील कंपनी टीएसी इन्फोसेक लिमिटेडचा (TAC Infosec Limited) आयपीओ 27 मार्चला उघडणार आहे. यासाठी 100-106 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओमध्ये 10 रुपये फेस व्हॅल्युचे 28.3 लाख नवीन शेअर जारी केले जातील. पब्लिक इश्यूमधून 29.99 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. आयपीओमध्ये 2 एप्रिलपर्यंत पैसे गुंतवता येतील. एँकर गुंतवणूकदार 26 मार्चला शेअर्ससाठी बोली लावू शकतील. टीएसी इनफोसेक लिमिटेडचा आयपीओ बंद झाल्यानंतर, एसएसई एसएमईवर 5 एप्रिलला शेअर्सची लिस्टिंग होऊ शकते.

आयपीओमध्ये बोली लावण्यासाठी किमान लॉट साइज 1200 शेअर्सची आहे. बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत. मार्केट मेकर स्प्रेड एक्स सिक्युरिटीज आहे. टीएसी इन्फोसेकचे प्रमोटर त्रिशनीत अरोरा आणि चरणजीत सिंग आहेत. सध्या कंपनीतील प्रमोटर्सचा हिस्सा 78 टक्के आहे, जो आयपीओनंतर 56.94 टक्के कमी होईल. आयपीओमध्ये, पात्र संस्थागत खरेदीदारांसाठी 50 टक्के, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 93.7% वाढून 10.14 कोटी झाला. निव्वळ नफा 735.05% ने वाढून 5 कोटी झाला आहे. एप्रिल-सप्टेंबर 2023 मध्ये, टीएसी इन्फोसेकचा महसूल 5.31 कोटी होता आणि निव्वळ नफा सुमारे 2 कोटी होता. टीएसी इन्फोसेकची सुरुवात 2016 मध्ये झाली.

TAC Infosec Limited IPO
IPO News : रेडिओवाला नेटवर्क लिमिटेडचा आयपीओ 27 मार्चपासून होणार खुला...

कंपनीच्या ग्राहकांमध्ये बँका, वित्तीय संस्था, सरकारी नियामक आणि विभाग, मोठे उद्योग यांचा समावेश आहे. यात एचडीएफसी, बंधन बँक, बीएसई, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि एनएसडीएल ई-गव्हर्नन्स यांचा समावेश आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com