Chandrayaan-3: चांद्रयान-3 यशस्वी झाल्यास 'या' कंपन्यांचे शेअर्स बनू शकतात रॉकेट, तुमच्याकडे आहेत का?

Chandrayaan-3 Update: चांद्रयान-3 मिशन यशस्वी झाले तर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे
Chandrayaan-3 Update
Chandrayaan-3 UpdateSakal

Chandrayaan-3 Update: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) चांद्रयान-3 चा बहुप्रतिक्षित मोहीम इतिहास रचण्यापासून काही पावले दूर आहे. चांद्रयान-3 चे लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज झाले असून ते 23 ऑगस्ट रोजी सुरक्षित लँडिंग करेल.

चांद्रयान-3 आपल्या मोहिमेकडे वाटचाल करत असताना, पृथ्वीवरील काही गुंतवणूकदारांच्या आशाही गगनाला भिडल्या आहेत. चांद्रयान-3 च्या या प्रवासात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व्यतिरिक्त 6 इतर कंपन्यांनीही मोठी भूमिका बजावली आहे.

जर हे मिशन यशस्वी झाले तर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता आहे, ज्याचा फायदा त्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनाही होईल. तज्ञांचे म्हणणे आहे की, या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे मार्ग देखील खुले होतील, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढेल.

जर भारताचे अंतराळ यान चंद्रावर यशस्वीरित्या उतरले तर चंद्र संशोधनात भारतासाठी नवीन मार्ग खुले होतील आणि ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील सकारात्मक मानले जात आहे. यामुळे भारतातील खाजगी अवकाश कंपन्यांसाठी नवीन गुंतवणुकीसाठी नवीन संधी आणि मार्ग खुले होतील.

Chandrayaan-3 Update
Ratan Tata Latest News : रतन टाटांना मारण्यासाठी दिली होती सुपारी, नेमकं काय घडलं होतं? खुद्द टाटांनीच सांगितला किस्सा

जागतिक अंतराळ बाजाराचे मूल्य 486 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 40 लाख कोटी रुपये आहे, जे 2032 पर्यंत 1879 अब्ज डॉलर्स म्हणजेच 154 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या बाजारपेठेतील भारताचे योगदान अनेक पटींनी वाढू शकते.

मिंटच्या अहवालानुसार, स्कायरूट एरोस्पेसचे सहसंस्थापक आणि सीईओ पवन चंदना म्हणतात की, जर चांद्रयान 3 यशस्वी झाले, तर भारत अमेरिका, रशिया आणि चीनसह अवकाश संशोधनाच्या यादीत सामील होईल.

चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणात कोणत्या कंपन्यांनी इस्रोला सहकार्य केले?

लार्सन अँड टुब्रो: L&T च्या एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने चांद्रयान 3 साठी स्पेस हार्डवेअर तयार केले. यासह, कंपनीने लॉन्च व्हेईकलच्या सिस्टम इंटिग्रेशनमध्ये योगदान दिले.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स: हिंदुस्तान एरोनॉटिक्सने चांद्रयान 3 च्या बांधकामासाठी राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांना अनेक महत्त्वाचे घटक दिले.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स: चांद्रयान 3 च्या बांधकामासाठी BHEL ने बॅटरी पुरवल्या. 2021 मध्ये BHEL ने चांद्रयान 3 मोहिमेसाठी ISRO ला 100 बॅटरी पुरवून एक अनोखा टप्पा गाठला आहे.

Chandrayaan-3 Update
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेच्या हप्त्यात होऊ शकते 50% वाढ

वालचंदनगर इंडस्ट्रीज: 1993 मध्ये PSLV-D1 लाँच झाल्यापासून वालचंदनगर इंडस्ट्रीजने इस्रोच्या सर्व 48 प्रक्षेपणांसाठी आवश्यक घटक पुरवले आहेत.

सेंटम इलेक्ट्रॉनिक्स: कंपनीने आतापर्यंत भारताच्या विविध अंतराळ मोहिमांसाठी 300 ते 500 घटक पुरवले आहेत.

एमटीएआर टेक्नॉलॉजीज: इंजिन आणि स्टेज तयार करण्यासाठी इस्रोने गोदरेज, एमटीएआर टेक्नॉलॉजीज आणि एचएएल यांची मदत घेतली.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com