Chennai Petroleum Corp : 'या' सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये तूफान तेजी, मार्च तिमाहीत 72% वाढला नफा

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (Chennai Petroleum Corp) शेअर्समध्ये सध्या चांगली वाढ दिसून येत आहे. नुकतेच कंपनीचे शेअर्स जवळपास 16 टक्क्यांनी वाढून 1,088 रुपयांवर पोहोचले, जो 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक आहे.
Chennai Petroleum Corp
Chennai Petroleum Corpsakal

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (Chennai Petroleum Corp) शेअर्समध्ये सध्या चांगली वाढ दिसून येत आहे. नुकतेच कंपनीचे शेअर्स जवळपास 16 टक्क्यांनी वाढून 1,088 रुपयांवर पोहोचले, जो 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ मार्च तिमाहीतील उत्कृष्ट निकालानंतर झाली आहे.

याशिवाय कंपनीने प्रत्येक शेअरवर 55 रुपये डिव्हिडेंड देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सांगितले की मार्च तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा सुमारे 72 टक्क्यांनी वाढून तिमाही आधारावर 627.89 कोटी होता, जो डिसेंबर तिमाहीत 365.28 कोटी होता. मात्र, मागील वर्षीच्या याच तिमाहीत 1,012.81 कोटीच्या नफ्यापेक्षा हा नफा कमी आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल 20,822.95 कोटी होता, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 21,350.05 कोटी होता. तर डिसेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 20,453.94 कोटी होता.

कंपनीने प्रति शेअर 55 रुपये डिव्हिडेंड जाहीर केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2024 साठी 550 टक्के इक्विटी डिव्हिडेंड देण्याची शिफारस केल्याचे स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक शेअरवर 10 रुपयांचे फेस व्हॅल्यू असलेले 55 रुपये डिव्हिडेंड देईल. मात्र, याला वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळणे बाकी आहे. येत्या काही दिवसांत डिव्हिडेंडच्या रेकॉर्ड डेटबद्दल माहिती देण्यात येईल.

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे शेअर्स नुकतेच 15.5 टक्क्यांनी वाढून 1,071.55 रुपयांवर गेले. 2024 च्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 52.15% वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन पूर्वी मद्रास रिफायनरीज लिमिटेड म्हणून ओळखली जात होते. ही इंडियन ऑइलची उपकंपनी आहे, जी भारत सरकारच्या मालकीची आहे.

Chennai Petroleum Corp
Share Market Opening: शेअर बाजारात तेजीचा 'सिक्सर'; सेन्सेक्स 74,500च्या जवळ, कोणते शेअर्स तेजीत?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com