Share Market Opening: शेअर बाजारात तेजीचा 'सिक्सर'; सेन्सेक्स 74,500च्या जवळ, कोणते शेअर्स तेजीत?

Sensex-Nifty Today: शेअर बाजारात शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 74,400 आणि निफ्टी 22,600 च्या जवळ व्यवहार करत आहे. बाजारपेठेत आयटी आणि मेटल क्षेत्रात सर्वाधिक खरेदी होत आहे.
Sensex-Nifty Today
Sensex-Nifty TodaySakal

Share Market Opening Latest Update 26 April 2024 (Marathi News):

शेअर बाजारात शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 74,400 आणि निफ्टी 22,600 च्या जवळ व्यवहार करत आहे. बाजारपेठेत आयटी आणि मेटल क्षेत्रात सर्वाधिक खरेदी होत आहे. मजबूत निकालांमुळे निफ्टी टेक महिंद्राच्या शेअर्सनी 10% झेप घेतली आहे. तर बजाज फायनान्सचे शेअर्स 5% घसरले आहेत.

Sensex Today
Sensex TodaySakal

जागतिक बाजारात काय स्थिती?

आजच्या व्यवहारात आशियाई बाजारांच्या चांगल्या ट्रेंडमुळे भारतीय बाजाराला पाठिंबा मिळत आहे. शुक्रवारच्या व्यवहारात जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी तेजीत आहे. हाँगकाँगचा हँग सेंग 51 पेक्षा जास्त अंकांनी तेजीत आहे, तर चीनचा शांघाय कंपोझिट देखील वाढीसह व्यवहार करत आहे.

मात्र, गुरुवारी अमेरिकन बाजारात घसरण नोंदवण्यात आली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 375 अंकांनी घसरला होता. तर S&P500 0.46 टक्क्यांनी आणि Nasdaq 0.64 टक्क्यांनी घसरले होते.

Nifty Today
Nifty TodaySakal
Sensex-Nifty Today
JP Morgan CEO: 'अमेरिकेला मोदींसारख्या नेत्याची गरज', जेपी मॉर्गनचे सीईओ यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक

टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट 

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सचे बहुतांश शेअर्स तेजीत होते. सुरुवातीच्या सत्रात 20 हून अधिक मोठे शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये 10 टक्के अप्पर सर्किट होते. टाटा स्टीलमध्ये सुमारे दीड टक्क्यांची वाढ झाली. आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील, एसडीएफसी बँक यांसारखे शेअर्सही घसरले होते.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

या कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांवर गुंतवणूकदारांची नजर

आज आदित्य बिर्ला सन लाइफ AMC, Autel, Bajaj Finserv, Bajaj Holdings, CSB Bank, Everady, Force Motors, HCL Technologies, Indiabulls RealEstate, KSB, Bank of Maharashtra, Mahindra Lifespaces, Maruti, Mastech, Mahindra Holidays रिसॉर्ट्स, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस, एनडीटीव्ही, पैसालो डिजिटल, एसबीआय कार्ड, एसबीआय लाइफ, शक्ती पंप्स, श्रीराम फायनान्स आणि उषा मार्टिन या शुक्रवारी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये आहेत.

Sensex-Nifty Today
Jobs In IT Sector: आयटी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीत फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी; 6,000 कर्मचाऱ्यांची करणार भरती

शेअर बाजारात आज कोणते शेअर्स चर्चेत?

इंटरग्लोब एव्हिएशन: कंपनीने 30 एअरबस ए350-900 विमानांची ऑर्डर दिली आहे, कंपनीकडे अतिरिक्त 70 एअरबस ए350 फॅमिली विमाने खरेदी करण्याचे अधिकार आहेत.

LIC: कंपनी बोर्डाने 14 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. मात्र, या निर्णयाला IRDA आणि सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका यांची मान्यता मिळणे बाकी आहे.

RITES: कंपनीने Rail Infra Telecom साठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी अल्ट्राटेक डेव्हलपरसोबत सामंजस्य करार केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com