

Stock Market Holiday Good Friday 18 April 2025: आजपासून सलग तीन दिवस भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहेत. आज शुक्रवार 18 एप्रिल 2025 रोजी, गुड फ्रायडेनिमित्त शेअर बाजार बंद राहील. यानंतर शनिवार आणि रविवार असल्यामुळे शेअर बाजार सलग 3 दिवस बंद राहणार आहे.
आता सोमवार 21 एप्रिल 2025 पासून नियमित व्यवसाय होतील म्हणजेच शेअर बाजारात व्यवहार पुन्हा सुरू होतील. या कालावधीत, एनएसई आणि बीएसईमध्ये इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि सिक्युरिटीज लेंडिंग आणि बोरोइंग (एसएलबी) सेगमेंटमध्ये कोणतेही ट्रेडिंग किंवा सेटलमेंट होणार नाही.