
Infosys Dividend 2025: इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2024-25च्या निकालांची तारीख निश्चित केली आहे. कंपनीच्या बोर्डाची 16 आणि 17 एप्रिल 2025 रोजी बैठक होईल, ज्यामध्ये जानेवारी-मार्च तिमाही तसेच संपूर्ण वर्षाच्या आर्थिक निकालांवर चर्चा केली जाईल. यादरम्यान अंतिम लाभांशावरही निर्णय घेतला जाईल, त्यामुळे ही बैठक गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे.