Share Market Today: आज शेअर बाजारात पैसे कमवण्याची संधी; तज्ज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Investment Tips: शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाले. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 167 अंकांनी वाढला आणि 71,595 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 65 अंकांनी वाढून 21,783 वर बंद झाला.
Share Market Investment Tips
Share Market Investment TipsSakal

Share Market Investment Tips: शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाले. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 167 अंकांनी वाढला आणि 71,595 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 65 अंकांनी वाढून 21,783 वर बंद झाला. बँक निफ्टी 623 अंकांनी वाढून 45,635 वर बंद झाला. तर मिडकॅप 439 अंकांनी घसरून 48,889 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

भारतीय बाजार ग्लोबल इंडेक्सच्या पावलावर पाऊल ठेवेल कारण बाजारासाठी कोणताही तात्काळ ट्रिगर नसल्याचे व्हेंचुरा सिक्युरिटीजचे विनीत बोलिंजकर म्हणाले. महागाईची आकडेवारी समोर आल्यानंतर आणि कॉर्पोरेट्सनी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर एप्रिलमध्ये बदल होईल असे ते म्हणाले. या प्रक्रियेत बाजारात बरेचदा प्रॉफीट बुकींग दिसून येईल. विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये अधिक अस्थिरता असेल.

निफ्टीची सुरुवात सपाट होती आणि ट्रेडिंग सत्रादरम्यान ती साइडवेज राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टीला सलग दुसऱ्या दिवशी 20 डिएमएवर सपोर्ट मिळाला. 21,690 च्या खाली घसरल्यास, आणखी घसरण होऊ शकते.

21690 च्या खालील घसरण निफ्टीला 21,500 पर्यंत नेऊ शकते. याउलट, निफ्टी 21,800 च्या वर गेला तर आपल्याला रिकव्हरी दिसू शकते.

Share Market Investment Tips
Berger Paints : बर्जर पेंट्स (शुक्रवारचा बंद भाव ः रु. ५५४)

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • ग्रासिम (GRASIM)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • सनफार्मा (SUNPHARMA)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • ए यू बँक (AUBANK)

Share Market Investment Tips
Apple AI : 'एआय'च्या शर्यतीत अ‍ॅपलची बाजी? एका वर्षात खरेदी केल्या तब्बल 30 स्टार्टअप कंपन्या

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com