Share Market Today: आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड? कोणते शेअर्स असतील तेजीत?

Share Market Investment Tips (Top Shares): बुधवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्सने आदल्या दिवशीच्या नुकसानाची काही प्रमाणात भरपाई केली. निफ्टी 22,600 च्या वर परतला आहे. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स 2,303.19 अंकांनी अर्थात 3.20 टक्क्यांनी वाढून 74,382.24 वर पोहोचला.
Share Market Today
Investment TipsSakal

Share Market Investment Tips: बुधवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्सने आदल्या दिवशीच्या नुकसानाची काही प्रमाणात भरपाई केली. निफ्टी 22,600 च्या वर परतला आहे. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स 2,303.19 अंकांनी अर्थात 3.20 टक्क्यांनी वाढून 74,382.24 वर पोहोचला आणि निफ्टी 735.80 अंकांनी म्हणजेच 3.36 टक्क्यांनी वाढून 22,620.30 वर पोहोचला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

मंगळवारचे ट्रेडिंग सत्र बाजारासाठी थोडे धक्कादायक होते असे शेअरखानचे रिसर्च हेड संजीव होटा म्हणाले. मात्र, आता भाजप पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्याने बुधवारी बाजारात तेजी दिसून आली. शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडर्सने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एफएमसीजी, फार्मा आणि आयटी यांसारख्या डिफेन्सिव्ह शेअर्सचा समावेश करावा, असे होटा यांचे मत आहे.

कॅपिटल गुड्स, डिफेन्स, इन्फ्रा, रिअल इस्टेट आणि पीएसयूच्या सिक्लिकल स्टॉकमध्ये आणखी करेक्शन दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यात गेल्या दोन वर्षांत यामध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे ते म्हणाले.

निफ्टीमध्ये बुधवारी मोठी रिकव्हरी दिसून आल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. या वाढीमध्ये, निफ्टी 21786 वर स्थित 100 डे मूव्हिंग एव्हरेज गाठताना दिसत आहे. निफ्टी त्याच्या 21 डे इएमएवर बंद झाला.

तेजी किंवा मंदी ओळखण्यासाठी महत्त्वाच्या स्तरांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. निफ्टी 21-डे इएमए किंवा 22500 च्या वर राहिल्यास, घसरणीवर खरेदी करण्याचे धोरण स्वीकारणे उचित ठरेल. सध्या निफ्टीला 22400 वर सपोर्ट दिसत आहे. तर 22800 वर रझिस्टंस दिसत आहे.

बँक निफ्टी इंडेक्समध्ये 200-डे मूव्हिंग एव्हरेजवरून रिकव्हरी पाहायला मिळाली. तो त्याच्या रायझिंग ट्रेंडलाइन आणि 21-डे इएमएवर बंद झाला. बँक निफ्टीमध्ये 47500 वर स्टॉप-लॉससह बॉय-ऑन-डिप धोरण अवलंबण्याचे सुचवले आहे. बँक निफ्टीसाठी, 47800 वर सपोर्ट आणि 49500 वर रझिस्टंस आहे.

Share Market Today
TV Channel Rates: 'अब की बार महंगाई की मार'; आता टीव्ही पाहणेही होणार महाग, चॅनलचे दर लवकरच वाढणार

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • महिन्द्रा अँड महिन्द्राा(M&M)

  • आयडिया (IDEA)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • व्होल्टास (VOLTAS)

Share Market Today
SpiceJet : ‘स्पाइसजेट’ उभारणार २५ कोटी डॉलरचा निधी

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com