Share Market Today: आज शेअर बाजारात नफा कमावण्याची उत्तम संधी; इंट्राडेमध्ये हे 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये

Share Market Investment Tips: सोमवारी बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 49.90 अंकांच्या अर्थात 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 73,856.05 वर बंद झाला आणि निफ्टी 27.20 अंकांच्या म्हणजेच 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 22,405.60 वर बंद झाला.
Investment Tips in marathi
Investment Tips in marathi Sakal
Updated on

Share Market Investment Tips (Marathi News): सोमवारी बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 49.90 अंकांच्या अर्थात 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 73,856.05 वर बंद झाला आणि निफ्टी 27.20 अंकांच्या म्हणजेच 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 22,405.60 वर बंद झाला.

जर आपण सेक्टरल इंडेक्सवर नजर टाकली तर बँक, ऊर्जा, इन्फ्रा आणि फार्मा यामध्ये तेजी दिसून आली, तर आयटी, मेटल, एफएमसीजी आणि ऑटोमोबाईल दबावाखाली राहिले. (Investment Tips in marathi Which 10 shares perform today NTPC HDFCLIFE ONGC 5 March 2024)

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

ब्रॉड इंडेक्सच्या किंमतीमुळे बाजारात अनिश्चितता दिसून येत असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. त्यामुळेच व्यापाऱ्यांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रांमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे.

निफ्टीने आठवड्याची सुरुवात एका कंसोलीडेटेड हालचालीने केली ज्यामुळे डेली चार्टवर दोजी कँडल तयार झाल्या. एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले की असे असूनही बाजाराचा एकूण कल तेजीचा आहे. निफ्टी 22,440 च्या वर गेल्यास त्याला आणखी तेजी येऊ शकते आणि तो 22,700 पर्यंत जाऊ शकते.

खाली निफ्टीला 22,200 वर सपोर्ट दिसत आहे. या सपोर्ट लेव्हलच्या दिशेने निफ्टीमध्ये काही घसरण होत असेल तर त्याचा खरेदीची संधी म्हणून वापर करा असा सल्लाही त्यांनी दिला.

बँक निफ्टी इंडेक्सने 47,000 च्या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलच्या वर राहून ताकद दाखवल्याचे कुणाल शाह म्हणाले. बँक निफ्टी बॉय मोडमध्ये आहे, येत्या काळात तिचा सर्वकालीन उच्चांक (All time high) ओलांडण्याची शक्यता आहे. यासाठी 47,500 वर रझिस्टंस आहे. जर आपण या पातळीच्या वर गेलो तर बँक निफ्टीमध्ये नवीन सर्वकालीन उच्चांक दिसू शकतो.

Investment Tips in marathi
PLI Scheme: सॅमसंग, टाटासह 'या' कंपन्यांना होणार फायदा; मोदी सरकार देणार हजारो कोटींचा निधी, काय आहे कारण?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एनटीपीसी (NTPC)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • ओएनजीसी (ONGC)

  • बीपीसीएल (BPCL)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (HDFCAMC)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • पीएफसी (PFC)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

Investment Tips in marathi
YouTube Layoffs: यूट्यूबने घेतला कठोर निर्णय! पगार वाढवून मागितला म्हणून कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com