Raymond Multibagger Stock : कपडे बनवणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदार मालामाल, 3 वर्षात 456% रिटर्न

या स्मॉल कॅप स्टॉकने कमी वेळेत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.
Raymond Multibagger Stock
Raymond Multibagger Stockesakal

Raymond Multibagger Stock : शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक अगदी कमी वेळेत गुंतवणुकदारांना दमदार नफा मिळवून देतात. यात धोका असला तरी अभ्यासाअंती केलेल्या गुंतवणुकीत कायम फायदा होत आलाय हा इतिहास आहे. अशाच शेअर्समध्ये रेमंड (Raymond) या कापड कंपनीचे शेअर्स येतात.

रेमंड हा जगभरातील लोकप्रिय कपड्यांचा ब्रँड आहे. या स्मॉल कॅप स्टॉकने कमी वेळेत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. त्यांनी केवळ तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 456 टक्के इतका मोठा नफा दिला आहे.

रेमंडने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 18% परतावा दिला आहे. त्याच वेळी, हा शे्अर गेल्या वर्षभरात 67 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या दोन वर्षात 456 टक्‍क्‍यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. एवढेच नाही तर या त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना कमी वेळेत मालामाल केले आहे. गेल्या जवळपास 20 वर्षांत गुंतवणूकदारांना 1,200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

एप्रिल 2020 मध्ये, त्याच्या शेअरची किंमत 220 रुपये होती. जी आता 1,225 रुपये झाले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांनी केवळ 3 वर्षांत तब्बल 456 टक्के नफा कमावला आहे. शेअरचा 53 आठवड्यांचा उच्चांक 1,644 रुपये आहे. तर, त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक 716.35 रुपये आहे.

Raymond Multibagger Stock
Mid Cap Multibagger Stocks: मिडकॅप इंडेक्सच्या केवळ एका शेअरने दिला मल्टीबॅगर रिटर्न; तुमच्याकडे आहे का हा शेअर?

रेमंड ही भारतातील एक आघाडीची सूटिंग निर्माता (Suiting Manufacturer) कंपनी आहे. ही कंपनी तिच्या फॅब्रिक्स आणि कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. रेमंड रेडी टू वेअर, पार्क अव्हेन्यू, कलरप्लस, पार्क्स आणि रेमंड मेड टू मेजर हे त्याच्या पोर्टफोलिओमधील काही प्रमुख ब्रँड आहेत. कंपनीने आपला पहिला प्रोजेक्ट TenX लाँच करून रियल्टी क्षेत्रात प्रवेश केला आहे. कंपनीने अलीकडेच प्रीमियम सिडेंशियल प्रोजेक्ट - द ऍड्रेस बाय जीएस हाऊसिंग (The Address by GS housing) लाँच केला आहे

Raymond Multibagger Stock
Multibagger Stock : कमाल आहे हा शेअर! १० हजाराच्या गुंतवणुकदाराला बनवलं करोडपती

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com