Bonus Share: ही कंपनी एका शेअरवर देणार 4 बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट जाहीर, एका वर्षात दिला 90 टक्के परतावा

Bonus Share: इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स सेक्टरमधील सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेडने (Salasar Techno Engineering) आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनी 4:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देत आहे.
Salasar Techno Engineering gives 4 bonus shares  performance details
Salasar Techno Engineering gives 4 bonus shares performance detailsSakal
Updated on

इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स सेक्टरमधील सालासर टेक्नो इंजिनीअरिंग लिमिटेडने (Salasar Techno Engineering) आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनी 4:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देत आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेटही निश्चित केली आहे.

बोनस शेअर्सच्या घोषणेनंतर, 20 जानेवारीला सालासर टेक्नोच्या शेअर्सने 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला धडक दिली. सालासर टेक्नो इंजिनिअरिंगचा हा शेअर पाच दिवसांत 30 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

सालासर टेक्नो इंजिनिअरिंग आपल्या गुंतवणूकदारांना 1 शेअरसाठी 4 बोनस शेअर्स देत आहे. सालासर टेक्नोने बोनस शेअर्ससाठी 1 फेब्रुवारी 2024 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. कंपनीने यापूर्वी जुलै 2021 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते.

Salasar Techno Engineering gives 4 bonus shares  performance details
Budget 2024: घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार? रिअल इस्टेट क्षेत्राला बजेटकडून काय अपेक्षा आहेत?

2006 मध्ये टॉवर उत्पादक, सालासर टेक्नो इंजिनीअरिंग स्टील स्ट्रक्चर उत्पादक आणि इपीसी इंफ्रास्ट्रक्चर कंपनी म्हणून उदयास आली, जी टेलीकॉम, एनर्जी आणि रेल्वे सेक्टर्सना सेवा देते.

स्मॉलकॅप कंपनी सालासर टेक्नो इंजिनिअरिंग हा मल्टीबॅगर स्टॉक आहे. हा शेअर एका महिन्यात 48 टक्के, 6 महिन्यांत 78 टक्के आणि 1 वर्षात 92 टक्के इतका वाढला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 2,995.41 कोटी आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 95.25 रुपये आणि निचांक 36 रुपये आहे.

Salasar Techno Engineering gives 4 bonus shares  performance details
Budget 2024: नोकरीचे टेन्शन संपणार? अर्थमंत्री अर्थसंकल्पात रोजगार योजनांबाबत घेणार मोठा निर्णय

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com