
SEBI New Logo: बाजार नियामक सेबीने बुधवारी आपल्या 35 व्या स्थापना दिनानिमित्त नवीन लोगोचे अनावरण केले. नवीन लोगो पारंपारिक निळ्या रंगाचा आहे. परंतु अधिक अत्याधुनिक डिझाइन त्यात केले आहे.
SEBI च्या चेअरपर्सन माधवी पुरी बुच म्हणाल्या, SEBI चा नवीन लोगो नियामकाच्या समृद्ध परंपरा, तसेच नाविन्यपूर्ण डेटा आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे.
हा लोगो SEBI ला सोपवलेल्या तीन क्षेत्रांमध्ये सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाचे, सिक्युरिटीजचे नियमन आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षण यांचे अद्भुत मिश्रण आहे. मार्केट रेग्युलेटरच्या 35 वर्षांच्या इतिहासात बुच या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत.
SEBI ची स्थापना 12 एप्रिल 1988 रोजी वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली. या संस्थेला 1992 मध्ये वैधानिक अधिकार मिळाले. सेबीचे मुख्य कार्यालय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे आहे.
तसेच तिची नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये प्रादेशिक कार्यालये आहेत आणि बंगळुरू, जयपूर, गुवाहाटी, पाटणा, कोची आणि चंदीगडसह डझनाहून अधिक शहरांमध्ये स्थानिक कार्यालये आहेत.
डेटा आणि तंत्रज्ञानाच्या अधिकारांमुळे नियामकाला त्याची परिणामकारकता अनेक पटींनी वाढण्यास मदत झाली आहे, असे सेबीने म्हटले आहे.
SEBI च्या देखरेखीखाली, भारतीय भांडवली बाजार काही दशकांमध्ये 265 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे आणि म्युच्युअल फंड उद्योगात 40 लाख कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापनाखाली आहे.
सेबीचे अधिकार :
१) स्टॉक एक्स्चेंजच्या उपनियमांना मान्यता देणे आहे.
२) अकाऊंट बुकची तपासणी करणे आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजमधून नियतकालिक परतावा मागवणे.
३) आर्थिक मध्यस्थांच्या लेखापुस्तकांची तपासणी करणे.
४) काही कंपन्यांना त्यांचे शेअर्स एक किंवा अधिक स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध करण्यास भाग पाडणे.
५) ब्रोकरची नोंदणी करण्याचा अधिकार सेबीकडेही आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.