Share Market Closing: शेअर बाजारात फ्लॅट ट्रेडिंग; सेन्सेक्स 65,945 वर बंद, कोणत्या शेअर्सवर दबाव?

Share Market Closing: मंगळवारी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सपाट बंद झाले.
Share Market update
Share Market updateSakal
Updated on

Share Market Closing Latest Update 26 September 2023: मंगळवारी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सपाट बंद झाले. BSE सेन्सेक्स 78 अंकांनी घसरून 65,945 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 9 अंकांनी घसरून 19664 वर बंद झाला. आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव होता.

मीडिया, आयटी, बँकिंग आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव होता. निफ्टीमध्ये सिप्ला आणि टेक महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर आयशर मोटर 2.5% पेक्षा जास्त वाढीसह निर्देशांकात अव्वल ठरला.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या ट्रेंडमध्ये एफएमसीजी शेअर्समध्ये सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. याशिवाय वाहन, मेटल, ऊर्जा, इन्फ्रा, कमोडिटी आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली.

बँकिंग, आयटी, पीएसयू बँका, फार्मा, मीडिया आणि खाजगी बँका आणि ग्राहक टिकाऊ वस्तू क्षेत्राशी संबंधित निर्देशांकात घसरण झाली आहे. आज मिड-कॅप निर्देशांकात घसरण झाली आहे, तर स्मॉल-कॅप निर्देशांकात मोठी वाढ दिसून आली आहे.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह आणि 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 25 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 25 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing 26 September 2023 (S&P BSE SENSEX)
Share Market Closing 26 September 2023 (S&P BSE SENSEX)Sakal
Share Market update
Rahul Gandhi: ''वतन को लूट लिया...'' अदानी अन् मोदी विरोधात काँग्रेसनं बनवलं गाणं, व्हिडिओ व्हायरल

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्समधे आज टेक महिंद्राचे शेअर्स 1.30 टक्क्यांनी घसरले. याशिवाय इन्फोसिस, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये वाढ

सेन्सेक्समध्ये आज नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.45% वाढ झाली आहे. यानंतर आज टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) चे शेअर्स वाढीसह बंद झाले.

Share Market update
2000 Note: दोन हजारांच्या नोटा अजूनही तुमच्या खिशात? बदलण्यासाठी शेवटचे चार दिवस! नाहीतर...

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 32,000 कोटींची वाढ झाली

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 26 सप्टेंबर रोजी 318.30 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार 25 सप्टेंबर रोजी 317.98 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 32 हजार रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 32 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com