
Share Market Closing 5 July 2023: बुधवारी शेअर बाजार सपाट बंद झाले. BSE सेन्सेक्स 33 अंकांनी घसरला आणि 65,446 वर बंद झाला. निफ्टी 9 अंकांच्या किंचित वाढीसह 19,398 वर बंद झाला. बाजारातील मंदीत बजाज ऑटो आणि मारुती सुझुकीचे शेअर्स होते. मारुतीच्या शेअरने प्रथमच 10 हजारांचा टप्पा पार केला. तर बजाज ऑटोचा शेअर 6% वाढून बंद झाला.
शेअर बाजारात आज बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसून आला. तर ऑटो, एफएमसीजी आणि मीडिया शेअर्समध्ये तेजी होती. याआधी मंगळवारी बाजार विक्रमी पातळीवर बंद झाला होता. BSE सेन्सेक्स 274 अंकांनी वाढून 65,479 वर बंद झाला.