Share Market Closing: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स 62,300 च्या वर, 'या' शेअर्समध्ये...

देशांतर्गत शेअर बाजारातील व्यवहार मोठ्या तेजीसह बंद झाले आहेत
Share Market latest updates today
Share Market latest updates today Sakal

Share Market Closing 15 May 2023: आज, देशांतर्गत शेअर बाजारातील व्यवहार मोठ्या तेजीसह बंद झाले आहेत आणि त्याचे दोन्ही प्रमुख निर्देशांक जबरदस्त वाढीसह बंद झाले आहेत. आज शेअर बाजाराची सुरुवात फारशी गतीने झाली नाही, परंतु दिवसाच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत राहिले आणि बंदही तेजीत झाले.

आज बीएसईचा सेन्सेक्स 317,81 अंकांच्या म्हणजेच 0.51 टक्क्यांच्या वाढीसह 62,345 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय, NSE च्या निफ्टीमध्ये 84.05 अंकांच्या म्हणजेच 0.46 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार 18,398 वर बंद झाला आहे.

बँक निफ्टीची चांगली वाटचाल

बँक निफ्टीने बाजाराला मागे टाकले आणि आज पुन्हा एकदा उच्चांक गाठला. 14 डिसेंबर 2022 रोजी बँक निफ्टीने उच्चांक गाठला आणि आज पुन्हा एकदा हा निर्देशांक या पातळीवर गेला आहे. आज बँक निफ्टीने 44,000 ची पातळी गाठली. फार्मा सेक्टरने आज चांगली कामगिरी केली नाही, आज फार्माचे शेअर्स घसरले आहेत.

Share Market Closing 15 May 2023
Share Market Closing 15 May 2023Sakal

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती

बीएसईच्या शेअर्समधील 30 शेअर्सपैकी 23 शेअर्समध्ये तेजी होती आणि केवळ 7 शेअर्स घसरणीसह बंद झाले. याशिवाय NSE च्या निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 33 शेअर्समध्ये वाढ आणि 17 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market latest updates today
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निफ्टीच्या निर्देशांकांची स्थिती:

सर्व 12 निफ्टी निर्देशांक आज वाढीसह बंद झाले आणि सकाळच्या संमिश्र हालचालींच्या तुलनेत बंद पूर्णपणे हिरव्या श्रेणीत होते. निफ्टीच्या रिअॅल्टी निर्देशांकाने आज मजबूत वाढ दर्शविली आणि तो 4.32 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

मीडिया शेअर्समध्ये 2.06 टक्क्यांची चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. एफएमसीजी शेअर्समध्ये 1.14 टक्के आणि पीएसयू बँकांमध्ये 1.13 टक्क्यांच्या वाढीसह आज व्यवसाय बंद झाला.

सेन्सेक्सच्या कोणत्या शेअर्समध्ये वाढ?

सेन्सेक्समध्ये वाढ झालेल्यांपैकी टाटा मोटर्स 2.94 टक्के आणि टेक महिंद्रा 1.93 टक्क्यांनी वधारले. आयटीसी शेअर्समध्ये 1.77 टक्के, एचयूएलमध्ये 1.45 टक्के आणि एलअँडटीमध्ये 1.14 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार बंद झाले. इन्फोसिस 1.06 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

Share Market latest updates today
AI Job Losses: जगभरात नोकर कपात होत असताना Zerodha CEO म्हणतात, आम्ही कोणालाही कामावरुन...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com