Share Market Closing: शेअर बाजार सलग सहाव्या दिवशी तेजीसह बंद; आज 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदी दिसून आली.
Share Market latest updates today
Share Market latest updates today Sakal

Share Market Closing 27th April 2023: या आठवड्यात सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदी दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 348 अंकांच्या वाढीसह 60,649 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 101 अंकांच्या वाढीसह 17,915 अंकांवर बंद झाला.

तेजीच्या शेअर्समध्ये बजाज ग्रुपचे शेअर्स आघाडीवर होते. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्समध्ये 2-2 टक्क्यांनी वाढ झाली. दोन्ही शेअर्स सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तर निकालानंतर एचयूएलचा शेअर्स घसरला.

शेअर बाजारातील तेजीचे कारण

  • जागतिक बाजारपेठेत तेजी

  • डॉलर इंडेक्समध्ये घसरण, 101.50 च्या खाली

  • इन्फोसिस, ITC, L&T, RIL, HDFC चे शेअर्स वाढले

BSE India
BSE IndiaSakal
Share Market latest updates today
Gautam Adani : गौतम अदानींचा भाऊ विनोद अदानींनी दिला राजीनामा, काय आहे प्रकरण जाणून घ्या

आजच्या व्यवहारात एफएमसीजी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, इन्फ्रा, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढीसह आणि 7 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 40 शेअर्स वधारले तर 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market latest updates today
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

गुंतवणूकदारांना 1.40 लाख कोटी नफा:

BSE वर सूचीबद्ध केलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज, 27 एप्रिल रोजी रु. 269.10 लाख कोटी झाले आहे, जे मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजेच बुधवार, 26 एप्रिल रोजी रु. 267.74 लाख कोटी होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.36 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.36 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

BSE मध्ये आजच्या व्यवहारात बजाज फायनान्स 2.39 टक्के, भारती एअरटेल 1.62 टक्के, इन्फोसिस 1.55 टक्के, कोटक महिंद्रा 1.37 टक्के, आयटीसी 0.89 टक्के, महिंद्रा अँड महिंद्र 02 टक्के वाढीसह बंद झाले. तर एचयूएल 1.46 टक्क्यांनी, पॉवर ग्रिड 1.13 टक्क्यांनी, अॅक्सिस बँक 0.76 टक्क्यांनी घसरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com