Share Market Today: शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगली कमाई करायची आहे? तज्ज्ञांनी सूचवले हे 10 शेअर्स

Share Market Tips: शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगली कमाई करायची असेल, तर तुम्ही या शेअर्समध्ये गुंतवणूक करु शकता.
Share Market
Share Market sakal

Share Market Investment Tips: शेअर बाजारातील दैनंदिन व्यवहारातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. बाजारात दररोज एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये किंवा शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून येते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये दररोज प्रमाणे, काही शेअर्स आज चांगली वाढ दर्शवू शकतात. जर तुम्ही अशा काही शेअर्सच्या शोधात असाल तर तुमचे पैसे तयार ठेवा.

शेअर बाजाराची क्षेत्रीय निर्देशांक स्थिती

आयटी, पीएसयू बँक आणि रियल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स वगळता निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. आयटी क्षेत्रात 0.67 टक्के, रिअल्टी क्षेत्रात 0.49 टक्के आणि कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये 0.33 टक्के वाढ झाली आहे.

धातू शेअर्समध्ये 0.89 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे आणि फार्मा शेअर्समध्ये 0.68 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. याशिवाय FMCG शेअर्समध्ये 0.63 टक्क्यांची घसरणीसह व्यवहार करत आहेत.

भारतात आरबीआयने चलनविषयक धोरण जाहीर केल्यानंतर, शेअर बाजारातील व्यापारी शुक्रवारी औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीवर लक्ष ठेवतील.

जर मुख्य क्षेत्रातील आकडेवारी जूनमधील अंदाजानुसार जास्त राहिली तर हे सिद्ध होईल की जागतिक आर्थिक मंदीनंतरही भारताचा जीडीपी वाढीचा दर चांगला राहण्याची शक्यता आहे. त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसू शकतो.

जुलै महिन्यातील महागाईचे आकडे समोर आल्यानंतर अमेरिकी बाजारांमध्ये घसरण होत असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Share Market
Indian Startup: आनंदाची बातमी! भारतीय स्टार्टअप्सनी कर्मचाऱ्यांच्या पगारात केली वाढ, किती मिळाला पगार?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एशियन पेंट्स (ASIANPAINT)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • ब्रिटानिया (BRITANNIA)

  • आयटीसी (ITC)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • ए यू बँक (AUBANK)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • व्होल्टास (VOLTAS)

Share Market
Smartphone Market India : देशातील स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठी घट; सॅमसंगला बसला फटका! चिनी कंपन्या मात्र जोमात

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.ण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com