Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात, 'या' शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Share Market Opening: बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत.
Share Market
Share MarketSakal

Share Market Opening Latest Update 21 August 2023:

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 65,000 च्या महत्त्वाच्या पातळीच्या वर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 19,350 चा स्तर गाठला आहे.

या क्षेत्रांमध्ये खरेदी

बाजाराच्या तेजीमध्ये आयटी, मेटल, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक खरेदी होत आहे. अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस हे निफ्टीमध्ये सर्वाधिक नफा मिळवणारे आहेत, तर M&M सर्वाधिक तोट्यात आहेत.

Share Market
Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोणते शेअर्स मिळवून देतील मोठा नफा? काय सांगतात तज्ञ
S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEX Sakal

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

पॉवरग्रीड, एनटीपीसी, टाटा स्टील, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक आज बीएसई सेन्सेक्सवर वाढीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, नेस्ले इंडिया आणि बजाज फायनान्स सेन्सेक्सवर घसरणीसह व्यवहार करत होते.

NSE IX वर, GIFT निफ्टी पाच अंकांनी किंवा 0.03 टक्क्यांनी घसरून 19,324.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात सपाट होऊ शकते असे संकेत मिळाले.

Share Market
अंबानींची जिओ फायनान्शिअल कंपनी आज बाजारात होणार लिस्ट, असा मिळू शकतो फायदा, काय सांगतात तज्ञ

आशियाई शेअर बाजारात नरमाई

आज आशियाई शेअर बाजारांमध्ये नरमाई दिसून आली. याचे कारण चीनने बाजाराच्या अंदाजापेक्षा व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे जपान आणि इतर आशियाई शेअर बाजारांमध्ये नरमाईचा कल दिसून आला.

Share Market
Multibagger Stocks: 90 वर्ष जुन्या कंपनीने गुंतवणुकदारांना केले मालामाल, 25 रुपयांच्या शेअरने केले कोट्यधीश

मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तपासे यांनी सांगितले की, इतर आशियाई बाजारातील कमजोरीमुळे बाजार कमकुवत उघडू शकतात कारण गुंतवणूकदारांना यूएस फेड रिझर्व्ह आणि इतर मध्यवर्ती बँकांद्वारे व्याजदरात आणखी वाढ होण्याची भीती वाटत आहे. जर असे झाले तर त्याचा परिणाम कर्जावर होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com