Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 66100 च्या जवळ, 'या' शेअर्सचे नुकसान

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजाराने सपाट सुरुवात केली आहे.
Share Market
Share MarketSakal

Share Market Opening Latest Updates Today 31 July 2023: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजाराने सपाट सुरुवात केली आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्स किंचित नरमाईसह व्यवहार करत आहेत.

BSE सेन्सेक्स 90 अंकांनी घसरून 66100 च्या जवळ आहे आणि NSE निफ्टी 30 अंकांनी घसरून 19,600 च्या पातळीवर आला आहे. बाजारात बँकिंग आणि FMCG क्षेत्रात सर्वाधिक विक्री होत आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

बीएसई सेन्सेक्सवर आज एशियन पेंट्सचे शेअर्स 1.01 टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, आयटीसी, बजाज फायनान्स, मारुती, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, टायटन, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी, भारती एअरटेल आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स घसरले.

Share Market
Share Market Today: सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज कोणते शेअर्स मिळवून देतील मोठा नफा? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात पॉवर ग्रिड आणि टाटा मोटर्सच्या शेअर्स वाढले आहेत. त्याचप्रमाणे एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, विप्रो, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक आणि लार्सन अँड टुब्रो यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.

Share Market Opening Latest Updates Today 31 July 2023
Share Market Opening Latest Updates Today 31 July 2023Sakal
Share Market
Multibagger Stock: 19 रुपयांच्या शेअरने केले मालामाल! आता कंपनी देणार 1 शेअरमागे 100 रुपयांचा डिव्हिडेंड

NSE IX वर, GIFT निफ्टी 21 अंकांच्या म्हणजेच 0.11 टक्क्यांच्या वाढीसह 19,811 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात आज सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळत होते. मात्र, शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली.

आज या कंपन्या तिमाही निकाल होणार जाहीर

मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड, गेल आणि अदानी ग्रीनसह इतर कंपन्या आज जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करतील. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर आज चर्चेत राहू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com