Share Market Opening : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार तेजीत, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ |Share Market Latest Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Opening : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार तेजीत, 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

Share Market Opening 31 March 2023 : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराने चांगली सुरुवात केली आहे. आशियाई बाजारांसह जागतिक बाजारातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत तेजी दिसून येत आहे. त्यामुळे बाजारासाठी आजचा दिवस चांगला जाण्याची शक्यता आहे.

सेन्सेक्स 58500 च्या वर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 17250 चा आकडा पार केला आहे. बाजारात चौफेर तेजी आहे. याचे कारण मजबूत जागतिक संकेत आहेत.

BSE India

BSE India

सुरुवातीच्या व्यवहारात बहुतेक मोठ्या कंपन्या तेजीच्या मार्गावर आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत.

आयटीसी आणि एशियन पेंट्स या दोन कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह उघडले. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचसीएल टेक 2-2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह उघडले. सर्व टेक शेअर्समध्ये आज तेजी दिसून येत आहे.

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 4% वाढले :

निफ्टीच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्स सर्वाधिक चार टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.

त्याचप्रमाणे नेस्ले इंडियामध्ये 2.93 टक्के, टेक महिंद्रामध्ये 2.07 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 2.07 टक्के आणि अ‍ॅक्सिस बँकेत 1.92 टक्के वाढीसह व्यवसाय केला जात आहे. निफ्टीवर सकाळी 09:16 वाजेपर्यंत 50 पैकी 46 शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.

निफ्टीवर सकाळी 09:16 पर्यंत, 50 पैकी फक्त चार घसरणीसह व्यवहार करत होते. एशियन पेंट्स, कोल इंडिया, आयटीसी आणि डिव्हिस लॅब्स सुरुवातीच्या व्यापारात घसरणीसह व्यवहार करत होते.

गुरुवारी अमेरिकन बाजारात तेजी दिसून आली. डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी 0.43 टक्क्यांनी, S&P 500 0.57 टक्क्यांनी आणि टेक-केंद्रित Nasdaq कंपोझिट इंडेक्स 0.73 टक्क्यांनी वाढले.

आशियाई बाजार मात्र सुरुवातीच्या व्यापारात मजबूत राहिले. जपानचा निक्केई जवळपास 0.1 टक्क्यांनी वधारला. तर हाँगकाँगचा हँगसेंग देखील 0.81 टक्क्यांनी वाढला आहे.