Share Market Opening: कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण; SBI च्या शेअरमध्ये...|Share Market Opening latest updates today 31 May 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market update

Share Market Opening: कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण; SBI च्या शेअरमध्ये...

Share Market Opening 31 May 2023: कमकुवत जागतिक संकेतांमुळे बुधवारी शेअर बाजार घसरणीसह उघडला. बाजारातील विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली आहे.

बीएसई सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरल्यानंतर 62,700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीही 77 अंकांनी घसरून 18550 च्या पातळीवर पोहोचला आहे.

SBI चे शेअर 2% घसरले:

बँकिंग क्षेत्रातील शेअर बाजारात विक्रीमध्ये आघाडीवर आहेत, ज्यामध्ये सरकारी बँकिंग स्टॉक्स आहेत. एसबीआयचा शेअर 2 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. याआधी मंगळवारी भारतीय बाजाराने सलग चौथ्या दिवशी तेजी नोंदवली होती.

Share Market Opening 31 May 2023

Share Market Opening 31 May 2023

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती:

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 11 शेअर्स तेजीसह आणि 19 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय, NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी केवळ 22 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत आणि 28 शेअर्स घसरणीच्या रेड झोनमध्ये व्यवहार करत आहेत.

याशिवाय आज बँक निफ्टी 336.60 अंकांच्या म्हणजेच 44,098 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसत आहे.

कोणत्या क्षेत्रात तेजी आहे, कोणत्या क्षेत्रात घसरण?

आयटी, मीडिया, फार्मा, हेल्थकेअर आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रात तेजीसह व्यवसाय होताना दिसत आहे आणि मेटल शेअर्स सर्वाधिक 1.29 टक्क्यांनी घसरले आहेत.

पीएसयू बँक शेअर्समध्ये 1.14 टक्के आणि तेल आणि वायूशेअर्समध्ये 0.83 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये वाढ:

सध्या तेजीत असलेल्या सेन्सेक्समधील 11 शेअर्समध्ये एचसीएल टेक, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, सन फार्मा, टाटा मोटर्स, नेस्ले, टीसीएस, भारती एअरटेल, इन्फोसिस, टायटन आणि विप्रो तेजीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

एसबीआय, एचडीएफसी, टाटा स्टील, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, मारुती, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, एचयूएल, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, एल अँड टी, टायटन, पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्सचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.