Share Market Opening: देशांतर्गत शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणते शेअर्स वधारले?

Sensex-Nifty Today: देशांतर्गत शेअर बाजाराची सोमवारी जोरदार सुरुवात झाली. मात्र, बाजारात किरकोळ नफा बुकिंग दिसून आले. कोटक महिंद्रा बँक आणि ब्रिटानियामध्ये जोरदार वाढ झाली. BSE सेन्सेक्स 318 अंकांच्या वाढीसह 74084 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 86 अंकांच्या वाढीसह 22561 अंकांच्या पातळीवर उघडला आहे.
Share Market Latest Update
Share Market Latest UpdateSakal

Share Market Opening Latest Update 6 May 2024 (Marathi News): देशांतर्गत शेअर बाजाराची सोमवारी जोरदार सुरुवात झाली. मात्र, बाजारात किरकोळ नफा बुकिंग दिसून आला. कोटक महिंद्रा बँक आणि ब्रिटानियामध्ये जोरदार वाढ झाली. BSE सेन्सेक्स 318 अंकांच्या वाढीसह 74,084 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी 86 अंकांच्या वाढीसह 22,561 अंकांच्या पातळीवर उघडला आहे.

Share Market Opening
Sensex TodaySakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

क्षेत्रनिहाय व्यवसायावर नजर टाकली तर, आयटी, एफएमसीजी, बँक, ऑटो, रिअल्टी, आरोग्यसेवा आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्र वेगाने आणि वाढीसह व्यवसाय करत आहेत. या व्यतिरिक्त, घसरण झालेल्या क्षेत्रांमध्ये, वित्तीय सेवा, मीडिया, मेटल, फार्मा आणि पीएसयू बँक शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली.

Share Market Opening
Nifty TodaySakal

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्समध्ये वाढ तर 10 शेअर्समध्ये घसरण होत आहे. कोटक महिंद्रा बँक 4.45 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे आणि ब्रिटानिया 2.84 टक्क्यांनी वाढला आहे. टीसीएस, इंडसइंड बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, टाटा कंझ्युमर, सन फार्मा, एम अँड एम आणि आयशर मोटर्सचे शेअर्स वाढत आहेत.

Share Market Opening
S&P BSE SENSEXSakal

घसरण झालेल्या सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये टायटन 4.12 टक्क्यांनी घसरला आहे. यानंतर कोल इंडिया, एसबीआय, बजाज ऑटो, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत.

Share Market Latest Update
Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

निफ्टीच्या शेअर्सची काय स्थिती?

निफ्टीच्या 30 शेअर्समध्ये वाढ होत असून 20 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, ब्रिटानिया, आयशर मोटर्स आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. टायटनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.32 लाख कोटींची वाढ

3 मे 2024 रोजी, BSEवर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,06,24,224.49 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 6 मे 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,07,56,366.08 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,32,141.59 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share Market Latest Update
Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

जागतिक संकेत काय आहेत?

आज देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र दिसत आहेत. आज आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून येत आहे. याआधी शुक्रवारी अमेरिकन बाजार वाढीसह बंद झाले होते. शुक्रवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 450 अंकांनी वाढून 38675.68 च्या पातळीवर बंद झाला. NASDAQ कंपोझिट 315 अंकांनी वाढून 16156.33 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 64 अंकांनी वाढून 5127.79 च्या पातळीवर बंद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com