Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 200 अंकांनी वर, कोणते क्षेत्र आघाडीवर?

Sensex-Nifty Today: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे जोरदार खरेदी होत आहे. सेन्सेक्स 73200 आणि निफ्टी 22200 च्या जवळ व्यवहार करत आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात खरेदी होत आहे.
Share Market Updates Sensex up 200pts, Nifty at 22,190 Auto, Consumer Durables under pressure
Share Market Updates Sensex up 200pts, Nifty at 22,190 Auto, Consumer Durables under pressure Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 28 March 2024 (Marathi News): गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे जोरदार खरेदी होत आहे. सेन्सेक्स 73200 आणि निफ्टी 22200 च्या जवळ व्यवहार करत आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात खरेदी होत आहे. पॉवर ग्रिड आणि डॉ रेड्डीज हे निफ्टीमध्ये सर्वाधिक तेजीत आहेत, तर अपोलो हॉस्पिटल्सला सर्वाधिक नुकसान झाले आहे.

बँकिंग शेअर्स तेजीत

आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्स तेजीत आहेत. यासोबतच वित्तीय सेवा शेअर्समध्येही वाढ होत आहे. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, बजाज फिन सर्व्हिस सुरुवातीच्या व्यवहारात तेजीत आहेत.

Sensex Today
Sensex TodaySakal

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

सुरुवातीच्या व्यवहारात ऑटो, बँकिंग, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी निर्देशांकात वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर आज पुन्हा वाढीसह उघडले. बजाज ऑटो, टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये सुरुवातीला वाढ झाली. इन्फोसिसचे शेअर्सही वधारत आहेत.

आज आर्थिक वर्ष 2023-24 चे शेवटचे ट्रेडिंग सत्र आहे. त्यामुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात बाजारात काही प्रमाणात अस्थिरता दिसण्याची शक्यता आहे.

Nifty Today
Nifty TodaySakal

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 27 शेअर्समध्ये वाढ तर 3 शेअर्स घसरत आहेत. सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह 2.14 टक्क्यांनी आणि बजाज फायनान्स 2.13 टक्क्यांनी वर आहे. ICICI बँक 1.51 टक्के आणि पॉवर ग्रिड 1.18 टक्क्यांनी वर आहे. Hero MotoCorp 1.17 टक्क्यांनी आणि SBI 1.16 टक्क्यांनी वाढले आहे.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal
Share Market Updates Sensex up 200pts, Nifty at 22,190 Auto, Consumer Durables under pressure
T+0 Trade: या 25 स्टॉक्समध्ये T+0 ट्रेड सेटलमेंट 28 मार्चपासून, BSE ने जाहीर केली यादी

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स घसरले?

आज घसरलेल्या सेन्सेक्स शेअर्समध्ये बजाजचा शेअर सर्वाधिक घसरला असून बजाज ऑटो 1.14 टक्क्यांनी घसरला आहे. अपोलो हॉस्पिटल्स 0.97 टक्क्यांनी आणि एचसीएल टेक 0.93 टक्क्यांनी घसरत आहेत. ब्रिटानिया इंडस्ट्रीज 0.91 टक्क्यांनी घसरला. अदानी एंटरप्रायझेस 0.72 टक्क्यांनी आणि अदानी पोर्ट्स 0.63 टक्क्यांनी घसरत आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.75 लाख कोटींची वाढ

27 मार्च 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 3,83,64,900.22 कोटी होते. आज म्हणजेच 28 मार्च 2024 रोजी बाजार उघडताच ते 3,85,40,506.12 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,75,605.9 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share Market Updates Sensex up 200pts, Nifty at 22,190 Auto, Consumer Durables under pressure
IPO News Update : ‘पीएनजी ज्वेलर्स’चा ‘आयपीओ’साठी अर्ज

आज शेअर बाजारात कोणते शेअर्स चर्चेत असणार?

  • BHEL: छत्तीसगडमध्ये थर्मल पॉवर प्लांट उभारण्यासाठी कंपनीला अदानी पॉवरकडून 4,000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे

  • डॉ रेड्डीज लॅब्स: कंपनीने SHIPL लस ब्रँडचा प्रचार आणि वितरण करण्यासाठी Sanofi Healthcare India सोबत पार्टनरशीप केली आहे.

  • बजाज फायनान्स: NBFC कंपनी IPO साठी तयारी करत आहे. IPOचा संभाव्य आकार 1 अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com