Market Cap: 'या' फार्मा कंपनीचे मार्केट कॅप 3 लाख कोटींच्या पार, शेअरमध्ये 2.5 टक्के तेजी

Sun Pharma Share: 1 वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा दिला आहे.
Sun Pharma market cap Rs 3 lakh crore, stock hits 52-week high
Sun Pharma market cap Rs 3 lakh crore, stock hits 52-week high Sakal

Sun Pharma Share: फार्मा कंपनी सन फार्माच्या (Sun Pharma) मार्केट कॅपने 3 लाख कोटीचा टप्पा ओलांडला आहे. स्टॉक 2.5 टक्क्यांनी वाढल्यानंतर 18 डिसेंबरवला मार्केट कॅपने ही पातळी गाठली. नुकतेच बीएसईवर सन फार्माचे शेअर्स 1,267.90 रुपयांच्या नवीन 52-आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला.

बीएसईवर कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 922.55 रुपये आहे. गेल्या 1 वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा दिला आहे. दिलीप सांघवी यांच्या मालकीची कंपनी ही फार्मा आणि हेल्थकेअर सेगमेंटमधील अतिशय दिग्गज मानली जाते.

Sun Pharma market cap Rs 3 lakh crore, stock hits 52-week high
Tanla Platforms: तानला प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्ये दमदार तेजी, एका वर्षात दिला 50 टक्के परतावा

चालू आर्थिक वर्षाच्या (FY24) सप्टेंबर 2023 तिमाहीत सन फार्माचा कंसोलिडेटेड निव्वळ नफा 5 टक्क्यांनी वाढून 2,375 कोटी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 2,262 कोटीचा निव्वळ नफा कमावला होता.

सप्टेंबरच्या तिमाहीत सन फार्माचे एकूण कामकाजातून उत्पन्न वाढून 12,192 कोटी झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 10,952 कोटी होते.

Sun Pharma market cap Rs 3 lakh crore, stock hits 52-week high
Denta Water IPO: डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्स लवकरच आणणार आयपीओ, सेबीकडे पेपर्स दाखल

या वर्षी मे महिन्यात हा शेअर 922.45 च्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून जवळपास 40% वाढला आहे. त्याचा एक वर्षाचा परतावा 27% इतका आहे जो या कालावधीत निफ्टीने दिलेल्या 16% परताव्यापेक्षा जास्त आहे तर निफ्टीच्या फार्मा इंडेक्सपेक्षा कमी आहे, ज्याने 29% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com