Tata Motors Demerger: टाटा मोटर्सचे शेअर्स सेन्सेक्स-निफ्टीमधून बाहेर पडणार का? डिमर्जरचा काय परिणाम होणार

Tata Motors Demerger: भारतातील आघाडीची वाहन कंपनी टाटा मोटर्स ही व्यवसाय दोन स्वतंत्र युनिटमध्ये विभागणार आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीने म्हटले आहे की टाटा मोटर्सचे डिमर्जर ही मोठी घटना नाही.
Tata Motors Demerger
Tata Motors DemergerSakal

Tata Motors Demerger (Marathi News): टाटा मोटर्सने डिमर्जरचा प्रस्ताव ठेवला आहे. व्यवसायाची दोन कंपन्यांमध्ये विभागणी करण्याची योजना आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हा व्यवसाय दोन लिस्ट कंपन्यांमध्ये विभागला जाईल. एक कंपनी व्यावसायिक वाहन कंपनी म्हणून लिस्ट केली जाईल. तर दुसरी कंपनी प्रवासी वाहन व्यवसायाशी संबंधित आहे. यामध्ये ईव्ही, जेएलआरचाही समावेश करण्यात येणार आहे. (Tata Motors Demerger Will Tata Motors Stock Exit Sensex Nifty)

टाटा मोटर्सच्या डिमर्जरनंतर कर्मचारी आणि ग्राहकांचे काय होईल?

कंपनीचे म्हणणे आहे की, डिमर्जरचा कर्मचाऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच, ग्राहक आणि भागीदारांवर परिणाम होणार नाही. कर्मचाऱ्यांसाठी सर्व सुविधा आणि नियम पूर्वीप्रमाणेच राहतील. ग्राहकांसाठी सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच राहतील.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीने म्हटले आहे की, टाटा मोटर्सचे डिमर्जर ही मोठी घटना नाही. टाटा मोटर्स सध्या ऑल पॅसिव्ह इंडेक्सचा भाग आहे आणि एकदा डिमर्जर पूर्ण झाल्यानंतर, लहान युनिट एक स्वतंत्र कंपनी बनेल. त्यानंतर टाटा मोटर्सचे व्यावसायिक वाहन युनिट निफ्टी आणि सेन्सेक्समधून बाहेर पडू शकते. ही प्रक्रिया येत्या 15 महिन्यांत पूर्ण होईल, असे नुवामा यांनी म्हटले आहे.

Tata Motors Demerger
Richest Person: ॲमेझॉनचे जेफ बेझोस बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; इलॉन मस्कची दुसऱ्या स्थानावर घसरण, काय आहे कारण?

टाटा मोटर्सच्या शेअर्सधारकांचे काय होणार?

ज्यांच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर्स आहेत. त्यांना डिमर्जर कंपन्यांचे शेअर्स मिळतील. भागधारकांना दोन्ही कंपन्यांमध्ये समान भागभांडवल असेल. गेल्या 3 वर्षात टाटा मोटर्सने असे अनेक निर्णय घेतले आहेत ज्यावरून असे समजते की ते आपले सर्व व्यवसाय वेगळे करणार आहेत.

2021 मध्ये, कंपनीने टाटा मोटर्ससाठी एमडी आणि सीईओची नियुक्ती केली नाही. त्यांनी दोन्ही व्यवसाय स्वतंत्रपणे चालवायचे ठरवले होते. टाटा मोटर्सने 2022 मध्ये पर्सनल वाहने आणि इलेक्ट्रिकल वाहनांसाठी एक उपकंपनी स्थापन केली होती. कंपनीला आशा आहे की आगामी काळात कंपनीच्या वाढत्या कामामुळे मार्जिन वाढण्यास मदत होईल.

Tata Motors Demerger
Elon Musk Sued : इलॉन मस्कने बुडवले 'एक्स'च्या माजी अधिकाऱ्यांचे 130 बिलियन डॉलर्स? पराग अग्रवालसह इतरांनी खेचलं कोर्टात

आर्थिक वर्ष 2023 मध्ये, टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसायाने कंपनीच्या एकूण महसुलात 79 टक्के योगदान दिले, ज्यामध्ये जग्वार लँड रोव्हरचाही समावेश आहे. टाटा मोटर्सच्या 3.41 लाख कोटी रुपयांच्या कमाईमध्ये व्यावसायिक वाहनांचा वाटा केवळ 21 टक्के होता.

टाटा मोटर्सच्या बोर्डाने सोमवारी कंपनीच्या व्यवसायाचे दोन स्वतंत्र युनिट्समध्ये विभाजन करण्यास मान्यता दिली. व्यावसायिक वाहने आणि संबंधित गुंतवणूक एक कंपनी म्हणून बाहेर पडतील तर प्रवासी वाहने वेगळी कंपनी बनतील, यात इलेक्ट्रिक वाहने आणि जग्वार लँड रोव्हर इत्यादींचाही समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com