Richest Person: ॲमेझॉनचे जेफ बेझोस बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; इलॉन मस्कची दुसऱ्या स्थानावर घसरण, काय आहे कारण?

World Richest Person: जगभरातील श्रीमंतांच्या यादीत इलॉन मस्क यांना मोठा धक्का बसला आहे. ब्लूमबर्गच्या मते, एक्स आणि टेस्लासारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत.
Elon Musk loses world’s richest person title to Jeff Bezos
Elon Musk loses world’s richest person title to Jeff BezosSakal

World Richest Person: जगभरातील श्रीमंतांच्या यादीत इलॉन मस्क यांना मोठा धक्का बसला आहे. ब्लूमबर्गच्या मते, एक्स आणि टेस्लासारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत. गेल्या 9 महिन्यांत पहिल्यांदाच मस्क श्रीमंतांच्या यादीत मागे पडले आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून इलॉन मस्कची जागा आणखी एका व्यावसायिकाकडे गेली आहे. टेस्ला कंपनीचे शेअर्स सोमवारी 7.2% घसरल्यानंतर इलॉन मस्क यांनी ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान गमावले.

एलोन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत

जेफ बेझोस इलॉन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. इलॉन मस्कची एकूण संपत्ती 197.7 अब्ज डॉलर आहे, तर बेझोसची संपत्ती 200.3 अब्ज डॉलर आहे. 2021 नंतर बेझोस प्रथमच श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.

Elon Musk loses world’s richest person title to Jeff Bezos
PLI Scheme: सॅमसंग, टाटासह 'या' कंपन्यांना होणार फायदा; मोदी सरकार देणार हजारो कोटींचा निधी, काय आहे कारण?

इलॉन मस्क मागे पडण्याचे कारण काय?

जागतिक बाजारात इलॉन मस्कची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे आणि त्यामुळे काल इलॉन मस्कची एकूण संपत्ती 17.6 अब्ज डॉलर्सनी कमी झाली आहे.

टेस्ला कंपनीच्या एकूण भांडवलात घट झाल्यामुळे इलॉन मस्कची एकूण संपत्ती 200 अब्ज डॉलरच्या खाली गेली. सध्या, एकूण 198 अब्ज डॉलर संपत्तीसह इलॉन मस्क ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात दुसऱ्या स्थानावर आहेत.

मुकेश अंबानी कोणत्या क्रमांकावर?

भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये 11 व्या क्रमांकावर आहेत आणि त्यांची संपत्ती 115 अब्ज डॉलर आहे. मुकेश अंबानी यांनी या वर्षात आतापर्यंत त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये 18.2 बिलियन डॉलरची भर घातली आहे.

आणखी एक भारतीय उद्योगपती गौतम अदानी या यादीत 12 व्या क्रमांकावर आहेत आणि सध्या त्यांची संपत्ती 104 अब्ज डॉलर आहे. या वर्षी गौतम अदानी यांच्या संपत्तीत 19.2 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

Elon Musk loses world’s richest person title to Jeff Bezos
Elon Musk Sued : इलॉन मस्कने बुडवले 'एक्स'च्या माजी अधिकाऱ्यांचे 130 बिलियन डॉलर्स? पराग अग्रवालसह इतरांनी खेचलं कोर्टात

ॲमेझॉन ऑनलाइन रिटेलरमध्ये सर्वात मोठा शेअरहोल्डर

जेफ बेझोस यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा त्यांच्या Amazon मधील 9% स्टेकमुळे आहे. Amazon ऑनलाइन रिटेलरमध्ये सर्वात मोठा शेअरहोल्डर आहे. जेफ बेझोससाठी जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थान मिळवणे काही नवीन नाही.

2017 मध्ये देखील, Microsoftचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. परंतु टेस्लाच्या शेअर्समधील प्रचंड वाढीमुळे 2021 मध्ये बेझोस मस्कच्या मागे पडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com